Foods Avoid Eating With Bottle Gourd: उन्हाळ्यात दिवसांत अनेक जण आवर्जून दुधी भोपळ्याची भाजी खातात. दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो. तसेच दुधी भोपळ्यामुळे वजन कमी करण्यास आणि पचनसंस्था सुधारण्यासही मदत मिळते. दुधी भोपळा पोषक घटकांनी समृद्ध आहे. दुधी भोपळ्यामध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणी असते, ज्यात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, पोटेशियम व मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात. परंतु, काही गोष्टी दुधी भोपळ्याबरोबर खाऊ नयेत. कारण- त्या खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

दुधी भोपळ्याबरोबर कधीही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी

आंबट पदार्थ

दुधीबरोबर कधीही आंबट पदार्थ खाऊ नयेत. दुधीमध्ये थंडावा असतो आणि जेव्हा तो आंबट पदार्थांसह खाल्ला जातो तेव्हा अपचनाची समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत लिंबू, दही अशा आंबट पदार्थांबरोबर दही खाऊ नका.

मुळा

मुळा कधीही दुधी भोपळ्यासोबत खाऊ नये. खरे तर दुधी भोपळा आणि मुळा दोन्हीमध्ये थंडावा असतो. अशा परिस्थितीत हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्यादेखील उद्भवू शकते.

मांसाहार

दुधी भोपळ्याबरोबर मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत. आयुर्वेदात हे निषिद्ध आहे. असे केल्याने शरीरात उष्ण आणि थंड प्रकृतीचे पदार्थ एकत्र येतात, ज्यामुळे अनेक शारीरिक त्रासाच्या समस्या उद्भवू शकतात. दुधी भोपळ्यासह मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्यांचा धोका असतो.

कारले

चुकूनही कारल्याबरोबर दुधी भोपळ्याचे सेवन करू नये. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात अॅसिडिटीचा धोका असतो, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्यादेखील उद्भवू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूध

आयुर्वेदात दुधासह दुधी भोपळा वर्जित मानले आहे. त्यामुळे अॅलर्जी, पचनाच्या समस्या व शरीरात विषारी घटकांचा संचय होऊ शकतो. दुधी भोपळ्यासोबत दुधाचे सेवन करायचे करू नका; परंतु कमीत कमी तीन तासांचे अंतर ठेवून तुम्ही दूध पिऊ शकता.