आचार्य चाणक्य, एक रणनीतिकार आणि महान अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिमत्तेने समृद्ध, त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांना समाजाची सखोल जाण होती, म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले, ज्यामध्ये त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. चाणक्याची धोरणे आजच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. असे मानले जाते की जो व्यक्ती आपल्या धोरणांचे पालन करतो, त्याला आयुष्यात कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही.

चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीने आपल्या मुलांसमोर आणि पत्नीसमोर कधीही बोलून दाखवू नयेत.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

चाणक्यजींच्या मते, चुकीचा व अपशब्द बोलल्याने त्याचा सर्वात जास्त त्रास होतो, त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी. कारण तुम्ही तुमच्या मुलांसमोर जसे वागाल तसेच ते तुमच्यासमोर वागतील.

आचार्य चाणक्य यांच्या मते आपण जे काही बोलतो किंवा कोणतीही क्रिया करतो. मुलं देखील तेच करू लागतात. म्हणूनच आपण मुलांसमोर अयोग्य भाषा वापरू नये तसेच पत्नीसोबत कधीही अपशब्द वापरू नये. कारण पत्नीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, मुलांसमोर किंवा पत्नीसमोर अशा गोष्टी कधीही करू नका, ज्यामुळे त्यांचा त्रास होईल. कारण टोचून बोलल्याने आणि एखादे वाक्य तेच धरून बसल्याने मुलांचा आणि पत्नीचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे घरात भांडण होत राहतात. त्यामुळे तुमचे नाते तणावमुक्त ठेवण्यासाठी पत्नीशी नेहमी प्रेमाने बोला.

चाणक्य जी मानतात की जर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे असेल तर तुम्ही स्वतः शिस्त पाळली पाहिजे. तरच तुमची पत्नी आणि मुलं शिस्त पाळतील. तसेच, कुटुंबाशी नम्रतेने बोलले पाहिजे आणि रागापासून दूर राहावे. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.