Tatoo : आपल्या आजूबाजूला असे अनेक ‘टॅटूलव्हर्स’ असतील ज्यांना टॅटू बनवायला आवडते. अनेक जण तर संपूर्ण शरीरावर टॅटू बनवतात तर काही लोक फॅशन किंवा ट्रेंड म्हणून टॅटूकडे बघतात; पण तुम्हाला माहिती आहे का की, शरीराच्या कोणत्या भागांवर टॅटू बनवू नये ते़. टॅटू बनवण्यापूर्वी आपल्याला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात. आज आपण जाणून घेऊ या त्याविषयी-
ज्या भागांवर टॅटू बनवल्यानंतर खूप जास्त त्रास होतो, अशा ठिकाणी टॅटू बनवू नये. शरीराच्या काही भागांवर टॅटू बनविणे खूप त्रासदायक ठरू शकते. असं म्हणतात की शरीराच्या ज्या भागांवर चरबी कमी असते त्या ठिकाणी टॅटू बनवल्यानंतर जास्त त्रास होऊ शकतो.
हेही वाचा : Cauliflower: फ्लॉवरमधील अळ्या काढा झटक्यात बाहेर, ही सोपी ट्रीक वापरून पाहा
शरीराच्या ‘या’ भागांवर चुकूनही टॅटू बनवू नका
पाय, घोटा, खांदा, बरगड्या, काखेत अशा कमी चरबी असणाऱ्या ठिकाणी टॅटू बनवू नका. शरीराच्या प्रत्येक भागावर एकसारखा त्रास होतो, असे नाही. काही ठिकाणी जास्त; तर काही ठिकाणी कमी त्रास होऊ शकतो.
हल्ली क्रिकेटर्सपासून सिनेअभिनेत्यांपर्यंत अनेक जण टॅटू बनवतात आणि त्यामुळे टॅटू बनवण्याची क्रेझ तरुणाईमध्येही दिसून येते. कुणी स्वत:चे नाव; तर कुणी प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराच्या नावाचा टॅटू काढतात. तुमच्या आवडीनुसार एकापेक्षा एक भारी डिझाइनचे टॅटू बनवून दिले जातात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)