बजाज ऑटो लवकरच नवीन छोटी Dominar बाइक आणणार असून Dominar ब्रँडअंतर्गत ही बजाजची दुसरी बाइक असेल. कंपनीने एका टिझर व्हिडिओद्वारे Dominar 250 च्या लाँचिंगबाबत माहिती दिली. 13 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये ‘D250’ नाव दिसत आहे, पण Bajaj Dominar 250 असे या नवीन बाइकचे नाव असेल अशी माहिती आहे. याच महिन्यात ही बाइक लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(आणखी वाचा –  ‘सर्वात स्वस्त’ BS6 बुलेट आली, ‘रॉयल एनफील्ड’ची Classic 350 लाँच झाली)

Bajaj Dominar 250 मध्ये नवीन इंजिन मिळेल. सध्या बजाज ऑटोकडे 250cc क्षमतेचे इंजिन नाहीये, याचा अर्थ छोट्या डॉमिनारमध्ये नवे इंजिन दिले जाईल. हे इंजिन KTM 250 Duke मध्ये दिलेल्या 248.8 cc सिंगल-सिलिंडर इंजिनवर आधारित असेल. केटीएममध्ये हे इंजिन जवळपास 30 bhp पावर आणि 24 Nm पीक टॉर्क निर्माण करते, पण डॉमिनारमध्ये या इंजिनला कमी पावर दिली जाण्याची शक्यता आहे. इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्सचा पर्यायही असेल. डिझाइन आणि स्टायलिंगच्या बाबतीत ही बाइक Bajaj Dominar 400 प्रमाणेच असेल. या बाइकचे काही फोटो सोशल मीडियावर ‘लीक’ झाले असून यावरुन बाइकमध्ये अप-साइड-डाउन फ्रंट फोर्क्स, रेग्युलर अॅलॉय व्हिल्स, स्प्लिट सीट्स, स्प्लिट ग्रॅब रेल्स आणि एलईडी टेललॅम्प हे फीचर्स असण्याची शक्यता आहे. डॉमिनार 400 प्रमाणे डॉमिनार 250 मध्ये ट्विन-पॉड एग्जॉस्ट सिस्टिम मिळेल.

(आणखी वाचा – Pulsar ला टक्कर, Hero ने आणली ‘झकास’ बाइक )

किंमत –
बजाज डॉमिनार 400 ची किंमत 1.90 लाख रुपये आहे. डॉमिनार 250 ची किंमत जवळपास 1.45 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये या बाइकची Yamaha FZ25, KTM 250 Duke आणि Royal Enfield Thunderbird 350X यांसारख्या बाइक्ससोबत स्पर्धा असेल.

(आणखी वाचा: आली Honda ची ‘पॉप्युलर’ बाइक, आता एकाच व्हर्जनमध्ये होणार विक्री?)

(आणखी वाचा: आली ‘हीरो’ची Super बाइक, आधीपेक्षा जास्त पावरफुल-ग्राउंड क्लिअरंसही वाढला)

(आणखी वाचा: पुण्यातून झालीये विक्रीला सुरूवात, पण बजाजची Chetak धावेचना…)