Don’t Eat This Things before Sleeping: आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. काही लोकांची अवस्था इतकी वाईट होते की, त्यांना डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. अशा वेळी तुम्हालाही झोप न येण्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीबरोबरच आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

कारण- अनेक वेळा बिघडलेली जीवनशैली किंवा चुकीचा आहार घेतल्यामुळेही रात्रीची झोप उडू शकते. आज आपण अशा काही पदार्थांची नावे माहिती करून घेऊ, ज्या गोष्टी रात्री खाणे टाळायला हव्यात. कारण- या गोष्टी खाल्ल्यानं रात्री झोप येणं कठीण जाऊ शकतं. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया.

जास्त साखरेचे पदार्थ

रात्री झोपण्यापूर्वी जास्त साखर असलेल्या गोष्टी खाणे टाळावे. कारण- त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी बदलू शकते आणि तुमची झोपेची लय बिघडू शकते.

आंबट फळांचा रस

कधीही झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी आंबट फळांचा रस पिऊ नये. रात्री नेहमी हलके जेवण घ्यावे. आंबट फळे तुमची झोप उडवू शकतात.

जड अन्न

रात्री अशा गोष्टी खाणे टाळा, ज्या पोटात गॅस तयार करू शकतात. ब्रोकोली, कोबी, फुलकोबी किंवा सुका मेवा रात्री खाणे टाळा. त्यामुळे गॅसची समस्या होऊ शकते.

सोया सॉस किंवा वांगी

रात्री झोपण्यापूर्वी वांगी किंवा सोया सॉस खाऊ नये. कारण- यामध्ये अमिनो अ‍ॅसिड सक्रिय करणारे घटक असतात, ज्यामुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Disclaimer: लेखात लिहिलेली माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहेत. कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी किंवा प्रश्नांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.