आता मिळणार ११ प्रमुख आजारांवर आयुर्वेदिक उत्पादनं

वेगवेगळ्या आणि दुर्मिळ आजारांवर सुरक्षित आणि योग्य उपचार शोधण्यास यश आले आहे

तेलंगनामध्ये स्थित असणाऱ्या आयुर्वेदिक फार्मास्यूटिकल कंपनी शशिक फार्मा प्राइवेट लिमिटेड यांनी आयुर्वेद क्षेत्रामध्ये इतिहास रचला आहे. कंपनीने ११ प्रमुख दुर्मिळ आजारांवर आयुर्वेदिक उत्पादने तयार केली आहेत. शशिक फार्मा प्राइवेट लिमिटेड २०१६ मध्ये स्थापन झाली आहे. डॉ शशिकला बांडी यांनी त्याची स्थापना केली आहे. मागील १० वर्षांपासून त्या आयुर्वेदामध्ये नव नवीन औषधे तयार करण्यासाठी झटत आहेत. त्यांनी आता वेगवेगळ्या आणि दुर्मिळ आजारांवर सुरक्षित आणि योग्य उपचार शोधण्यास यश आले आहे. आपल्या अभ्यासादरम्यान डॉ. बांडीनी अनेक रोग्याचे उपचार केले आहेत आणि त्यांना त्यामध्ये ९५% यश सुद्धा आले आहे.

याबद्दल बोलताना डॉ. शशिकला बांडी म्हणाल्या की “आमच्या उत्पादनांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयामधून विक्रीसाठी अनुमती मिळालेली आहे. आता खूप मोठ्या प्रमाणावर जनसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे हे आमचे ध्येय असेल. आमची उत्पादने थायरॉईड, स्त्रीरोग, पीसीओडी, किडनी स्टोन, त्याच प्रमाणे वंधत्व यासारख्या आजारांवर गुणकारी आहे.”

थायरो क्यु – थायरॉईड या आजारासाठी
स्टोनजेन – किडनी आणि स्टोनच्या आजारांसाठी
गायनो क्यु – कुमारी अवस्थेपासून वयोवृद्ध आजी पर्यंत सर्व स्त्रियांसाठी
पेनजेन – हाडे दुखीवर उपचारी
डॉ शाशिक हेअर तेल – केसांच्या उत्तम वाढीसाठी
रीसाॅल्वेंट- ट्युमर च्या आजारासाठी
रेनोविन – तारुण्य कायम ठेवण्यासाठी
फर्टिल एफ -पुरुष किंवा महिला वंधत्व
लीपोलेस- वजन कमी करण्यासाठी
लिपो क्यु- जास्त मेध, मधुमेह या करिता
ओजोविन- शुक्राणूची संख्या वाढवण्यासाठी उपयोगी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Now will get 11 aayurvedic medicine for various disease