How to Clean Oily Steel Utensils: स्वयंपाकघरात सगळ्यात जास्त त्रास आणि कंटाला तेव्हा येतो जेव्हा एखादं तेलकट किंवा लोणचं भरलेलं भांडं धुवायचं असतं. मग ते काचेचं जार असो किंवा स्टीलचं भांडं असो, तेल इतकं चिकटलेलं असतं की कितीही धुतलं तरी चिकटपणा आणि वास जात नाही. महागडे साबण आणि डिटर्जंट सुद्धा कधी कधी काहीच कामाचे नसतात. पण डोंगराळ भागांमध्ये आजही एक साधा देशी उपाय वापरला जातो, जो केमिकलशिवाय अशी तेलकट भांडी अगदी नवीनसारखी स्वच्छ करतो. ना कुठल्या ब्रशची गरज, ना पुन्हा पुन्हा धुण्याची. फक्त दोन घरगुती वस्तू आणि एक मिनिट वेळ.
तेल आणि लोणच्याच्या भांड्यांची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्यांचा चिकटपणा आणि वास. जर हे भांडे नीट धुतले नाही, तर पुढच्या वेळी वापरताना जुन्या तेलाचा विचित्र वास येतो. खासकरून काचेच्या बरण्यांमध्ये ही अडचण जास्त असते, कारण त्यात तेलाचा एक थर बसतो आणि कितीही साबणाने धुतलं तरी तो तसाच राहतो. एवढंच नाही, कधी कधी साबणाचा वास सुद्धा बरणीत राहतो, जो नंतर अन्नामध्ये मिसळतो. म्हणूनच आता लोक परंपरागत, जुने घरगुती उपाय वापरण्याकडे परत वळत आहेत.
तेलकट, लोणच्याची भांडी साफ करण्याचा घरगुती उपाय (How to clean Pickle Jar)
डोंगराळ भागात आजही लोक घरच्या गोष्टींनीच सगळी कामं करतात. तेल किंवा लोणच्याची बरणी साफ करण्यासाठी तिथं एक अगदी सोपा पण उपयोगी उपाय केला जातो.
सर्वप्रथम बरणीत थोडंसं गरम पाणी टाकलं जातं. गरम पाण्यामुळे तेल थोडंसं वितळतं आणि भांड्यापासून सुटायला लागतं. त्यानंतर त्यात एक चमचा मोहरीचं तेल टाकलं जातं. हे ऐकायला जरा विचित्र वाटेल – आधीचं तेलकट भांडं आणि त्यावर पुन्हा तेल – पण हीच खरी युक्ती आहे. नंतर त्यात एक चिमूटभर पीठ टाकून बरणी चांगली हलवली की ते पीठ सगळं उरलेलं तेल शोषून घेतं आणि एक जाडसर पेस्ट तयार होतं, ही पेस्ट संपूर्ण बरणी नीट साफ करून टाकते.
ही पद्धत कशी काम करते?
पिठाची खास गोष्ट अशी आहे की ते तेलाला स्वतःकडे खेचून घेतं. जेव्हा पिठात मोहरीचं तेल मिसळतं, तेव्हा ते भांड्याला चिकटलेलं जुनं तेलसुद्धा आपल्याकडे ओढून घेतं. बरणी हलवल्यावर हे मिश्रण सगळ्या भांड्यात पसरतं. आणि नंतर जेव्हा हे पाण्याने धुतलं जातं, तेव्हा सगळा चिकटपणा आणि वास एकदम निघून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही केमिकल न वापरता हे सगळं होतं.