स्मार्टफोन बनवणारी कंपनी OPPOने भारतात आपला एक नवा बजेट स्मार्टफोन OPPO A1K लाँच केला आहे. परवडणाऱ्या किंमतीत या स्मार्टफोनमध्ये उत्तमोत्तम फीचर्स देण्यात आलेत.
देशभरातील मोबाइल दुकानांसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम मॉल आदी शॉपींग पोर्टल्सवरून हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. 8 हजार 490 रूपये इतकी या स्मार्टफोनची किंमत ठरवण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉपसह 6.1 इंच आकारमानाचा व 19:5:9 इतकी अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले आहे. यामध्ये मिडियाटेकचा हेलीओ पी 22 हा प्रोसेसर आहे. स्मार्टफोनच्या डिस्प्लेसाठी गोरीला ग्लासचा वापर करण्यात आला आहे, मात्र कोणत्या प्रकारचा गोरीला ग्लास वापरण्यात आलाय याबाबत माहिती मिळालेली नाही. स्मार्टफोनमध्ये रॅम 2 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 32 जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातील मुख्य कॅमेरा 8 तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल्सचा आहे. यामध्ये तब्बल 4,000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय आवृत्तीवर चालणारा असून यावर कलर ओएस 6.0 हा युजर इंटरफेस प्रदान करण्यात आलेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्ल्यु-टूथ आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक देखील आहे.