Oral Health Tips: आंतरराष्ट्रीय डेंटल जर्नल (२०२३) नुसार, फक्त ४५% भारतीय दिवसातून दोनदा दात घासतात. रात्री ब्रश न करणे ही एक सामान्य सवय आहे.ओरल हेल्थ टिकवण्यासाठी दात आणि हिरड्यांची नियमित स्वच्छता फार महत्वाची आहे. डेंटिस्ट्सच्या मते, दिवसातून दोनदा दात घासले तर अनेक समस्या टाळता येतात ,जसे की कॅविटी, दातांमधली कीड, हिरडयांची सूज, आणि दुर्गंधी

तोंडाची व दातांची योग्य काळजी घेणे हे संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दात आणि हिरडयांची स्वच्छता नियमित ठेवली तर अनेक आजारांपासून बचाव होतो. ओरल हेल्थ (तोंडाची स्वच्छता) टिकवण्यासाठी सर्वात मूलभूत आणि गरजेची गोष्ट म्हणजे ब्रश करणे. दंततज्ज्ञांच्या मते, दिवसातून किमान दोनदा ब्रश केल्यास दात सडणे, कीड लागणे, हिरड्या सुजणे, दुर्गंधी येणे यांसारख्या अनेक समस्या टाळल्या जाऊ शकतात. सकाळचा ब्रश आपल्याला ताजेतवाने ठेवतो आणि रात्रभर साचलेले बॅक्टेरिया दूर करतो. यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी केलेला ब्रश हा रात्री शरीरात लाळेचे प्रमाण कमी करते, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने सकाळी नाश्त्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन मिनिटे फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने ब्रश करणे आवश्यक आहे.

शक्य असल्यास दररोज एकदा माउथवॉशचा वापर करावा आणि फ्लॉसिंगची सवय लावावी. अशा सवयी केवळ दातांना मजबूत ठेवत नाहीत, तर संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कारण तोंडाची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम हृदय, किडनी आणि इतर अनेक अवयवांवर होऊ शकतात.भारतामध्ये मात्र लोक दात घासणे ही फक्त सकाळची ताजेतवाने करणारी कृती मानतात. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे ही गोष्ट अनेकांच्या दिनचर्येत नसते. थकवा, विसरभोळेपणा किंवा या गोष्टीचं महत्त्व न कळल्यामुळे जवळपास निम्मे भारतीय रात्री ब्रश करत नाहीत.

किड लागण्यापासून संरक्षण

दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातांवर राहिलेले अन्नकण आणि प्लाक सहज निघून जातात. त्यामुळे दात सडण्याची किंवा किड लागण्याची शक्यता कमी होते. विशेष म्हणजे रात्री जेवणानंतर ब्रश केल्यास दातांवर उरलेले अन्नकण रात्रीभर सडत नाहीत आणि त्यामुळे दातात कीड व जंतूपासून सुरक्षित राहतात.

दुर्गंधीपासून मुक्ती

जर आपण रात्री दात घासले नाही तर तोंडात बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर तोंडाला दुर्गंधी येते. रात्री ब्रश केल्याने हे बॅक्टेरिया दूर होतात आणि सकाळी ताजेपणा मिळते. यामुळे ‘बॅड ब्रीथ’ची समस्या टाळता येते.

हिरड्यांच्या आजारांपासून बचाव

दातांच्या कडेवर प्लाक जमा झाल्यास हिरड्यांना सूज येणे, रक्त येणे किंवा वेदना होणे सुरू होते. नियमित ब्रश केल्याने हा प्लाक निघून जातो आणि हिरड्यां निरोगी व मजबूत राहतात. त्यामुळे दात आणि हिरड्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते.

प्लाक रोखले जातात

दिवसातून दोनदा – सकाळी आणि रात्री – ब्रश केल्याने दातांवर जमा होणारा प्लाक लगेच साफ होतो. जर तो काढला नाही तर तो हळूहळू कठीण होऊन टार्टरमध्ये बदलतो, ज्यामुळे दातांवर डाग पडतात आणि संसर्ग होऊ शकतो. नियमित ब्रशिंग ही समस्या टाळते.

दात तुटण्याचा धोका कमी होतो

नियमित ब्रशिंग केल्याने फक्त दातच नाही तर हिरड्या आणि दातांना आधार देणारी हाडे देखील मजबूत राहतात. त्यामुळे दात दीर्घकाळ सुरक्षित राहतात आणि वय वाढले तरी सहज तुटत नाहीत.