कॅलेंडरवर फक्त काही तारखा अशा आहेत ज्या संख्यात्मकदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आहेत. अशा तारखांची अचूकता सहसा दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर येते. अशाच या आठवड्याच्या तारखा आहेत. या तारखा केवळ दुर्मिळच नाहीत तर, जास्त दुर्मिळ आहे. याच कारण म्हणजे या तारख पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम दोन्ही आहे. याचा अर्थ कोणीही या तारखा जवीकडून, डावीकडून कशाही वाचल्या तरी सारख्याच दिसतील.
उदारणार्थ आजची तारीख २२/०२/२०२२ ब्रिटीश फॉरमॅटमध्ये लिहिल्यास, तारीख पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम बनते, जो एक नमुना विशेष आणि अत्यंत दुर्मिळ आहे. तारखा पॅलिंड्रोम असणे असामान्य नाही. उदाहरणार्थ, अमेरिकन फॉरमॅट – २/२०/२०२२ मध्ये लिहिले असल्यास २० फेब्रुवारी २०२२ देखील एक होऊ शकतो.
(हे ही वाचा: Happy Twosday 22/2/2022: आजची तारीख आहे खास; जाणून घ्या कारण)
या तारखा वापरून ब्रँड आणि कंपन्या खाद्यपदार्थ आणि उत्पादनांवर डील्स, ऑफर करत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी किंवा आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी या चांगल्या तारखा आहे.
(हे ही वाचा: ‘या’ व्हायरल फोटोत दडलेला आकडा तुम्ही सांगू शकता का? ९९ टक्के लोक ठरले अपयशी)
या दुर्मिळ तारखांबद्दल नेटीझन्स सोशल मीडियावर चर्चा करताना दिसत आहेत. याविषयीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत.