Parenting Tips: स्मार्टफोन ही आजच्या काळात इतकी गरजेची झाली आहे की त्याचा वापर फक्त प्रौढच नव्हे तर लहान मुलेही करतात. केवळ मोबाईल गेम खेळण्यासाठीच नाही तर अनेक वेळा त्यांना शाळेचे प्रोजेक्ट आणि गृहपाठ करण्यासाठीही फोन वापरावा लागतो. पण अनेकदा पालकांच्या मनात हा भिती असते की, जेव्हा ते मुलांना मोबाईल देतात तेव्हा ते चुकीच्या गोष्टी पाहू शकतात किंवा ते फोनचा गैरवापर करू शकतात. पालकांची ही भिती दूर करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स येथे सांगितल्या आहेत.

अडल्ट कंटेट प्रायव्हसी (Adult Content Privacy)
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना फोन देता तेव्हा लक्षात ठेवा की आधी Android वर Google Play Restrictions चालू करा. अशा परिस्थितीत मुले अशा गेम्स आणि वेबसाइट्सपासून दूर राहतील ज्यावर अडल्ट कंटेट उपलब्ध आहे. यासाठी, Google Play Store च्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या सेटिंग्जमध्ये जा, त्यानंतर पॅरेंट कंट्रोलचा पर्याय निवडा, येथे तुम्ही पिन टाकून लॉक करू शकता.

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!

हेही वाचा – आई-वडीलांच्या ‘या’ चुकामुळे मुलांवर होतात चुकीचे संस्कार! मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवताना पालकांनी काय काळजी घ्यावी?

सोशल मीडिया सेटिंग्ज
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना फोन देता तेव्हा नेहमी सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग चालू करा. YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पॅरेंट कंट्रोल पर्याय उपलब्ध आहे, जो सुरू करून तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीव लक्ष ठेवू शकता.

तुमचा ईमेल आयडी वापरू देऊ नका
अनेक वेळा तुम्ही तुमच्या फोनवर तुमचा पर्सनल इमेल आयडी टाकून मुलांना देता, यामुळे मुलं तुमचा ईमेल आयडी वापरून कोणताही गेम किंवा ॲप खरेदी करतात, त्यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते, त्यामुळे मुलांसाठी वेगळा ईमेल आयडी तयार केला.

हेही वाचा – बदाम, ओट्स, डाळ खाण्यापुर्वी भिजवल्यास मिळतील दुप्पट फायदे; तज्ज्ञ काय सांगतात, वाचा

मुलांना इंटरनेट सुरक्षा टिप्स शिकवा
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल फोन देता तेव्हा त्यांना इंटरनेट सुरक्षेबद्दल सांगा, मुले व्हायरस, मालवेअर, सायबर गुन्हे आणि ऑनलाइन पेमेंटपासून स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात हे सांगा आणि OTP किंवा इतर खाते तपशील कधीही कोणाशीही शेअर करू नका हे सांगा.

तुमचा एटीएम पिन आणि बँक तपशील सुरक्षित ठेवा
जर तुमची मुले वाढत्या वयात असतील आणि तुम्हाला भीती वाटत असेल की, ते तुमच्या वैयक्तिक गोष्टींचा गैरवापर करतील, तर तुमच्या बँक खात्याचे तपशील जसे की पासवर्ड, एटीएम पिन तुमच्या फोनमध्ये सुरक्षित ठेवा किंवा फोनऐवजी डायरीत लिहा.