Parenting Tips: भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर असणे ही अशी गोष्ट आहे जी हुशार लोक नियंत्रित करू शकत नाहीत. पण, आयुष्यात भावनिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर असणं खूप गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकली नाही, तरी पराभव स्विकारते. एखादी व्यक्ती नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्यास असमर्थ असेल आणि प्रत्येक लहान-मोठ्या अडचणीत त्यांना पराभूत झाल्यासारखे वाटत असेल आयुष्यात पुढे जाणे कठीण होईल. अशा स्थितीत व्यक्तीच्या भविष्यावर आणि यशावरही परिणाम होतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमचे मूल त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यास घाबरत आहे, लाजाळू आहे आणि राग किंवा दुःख यासारख्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहित नाही, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून त्याला मदत करू शकता.
मुलांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचे मार्ग
भावना व्यक्त करायाला शिका
हे खूप महत्त्वाचे आहे की मुलांना भावना व्यक्त करण्यास शिकवा. जर मुलं आपल्या भावना मनात दाबून ठेवत असतील तर त्या भावना त्यांच्या बालमनाला प्रभावित करु शकते. तसेच तो दुखी असेल तर दुख स्वत:पर्यंत ठेवतो आणि चिडचिडा होतो आणि मनातल्या मनात घुसमट होत राहते.
मुलांबरोबर त्यांच्या भीतीबद्दल बोला
आपल्या मुलाने आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीत आघाडीवर असावे असे अनेक पालकांना वाटते. अशा परिस्थितीत, ते त्याला जिंकायला शिकवतात परंतु मुलाच्या चिंता आणि पराभवाशी संबंधित त्यांचे काहीही ऐकूण घेत नाही. पालकांनी मुलांची भीती ऐका, भीतीवर मात करण्यातच विजय आहे हे त्याला समजावून सांगणे आणि भीतीवर मात करण्यास शिकवणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – नेहमी तंदुरुस्त राहायचे असेल तर स्वत:ला ‘या’ ५ सवयी लावा; नेहमी राहाल निरोगी
मुलांचे मत ऐका
तुम्हाला तुमच्या मुलामध्ये हा विश्वास वाढवावा लागेल की तो तुमच्याकडे येऊ शकतो आणि त्याच्या मनातील सर्व काही सांगू शकतो. जेव्हा मुल त्याच्या चिंता आणि समस्या तुम्हाला सांगतात तेव्हा त्याचे सर्व म्हणणे ऐका. तुम्ही त्याला उपाय देऊ शकाल. यामुळे त्याच्या मनावरील ओझे हलके होईल आणि अडचणींना कसे सामोरे जावे हे त्याला समजेल.
मुलांना टोमणे मारू नका
जेव्हा पालक प्रत्येक गोष्टीसाठी मुलाला टोमणे मारायला लागतात, तेव्हा मूल भावनिकदृष्ट्या मजबूत होण्याऐवजी कमकुवत होते. त्याच्या मनात भीती निर्माण होऊ लागते की त्याला पुन्हा काही चूक झाली तर त्याला फटकारले जाऊ शकते. मुलांना ओरडल्यानंतर त्याची पहिली भावना म्हणजे दुःख आणि त्याचे अश्रू कधी वाहू लागतात हे त्याला समजत नाही.
हेही वाचा – कुरळ्या केसांची सुंदरता वाढवेल ‘हे’ तेल; कसा करावा वापर? जाणून घ्या
सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा
पालक या नात्याने तुमच्या पाल्याला सकारात्मक व्हायला शिकवणे हे तुमचे कर्तव्य आहे. जर तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्याला सकारात्मक राहून अडचणींवर मात करायला शिकवा. मुले हे सर्व त्यांच्या पालकांकडून शिकू शकतात.कुरळ्या केसांची सुंदरता वाढवेल ‘हे’ तेल; कसा करावा वापर? जाणून घ्या