Pee More Than Usual Reason: ‘पाणी म्हणजेच जीवन’ ही फक्त एक म्हण नाही तर ते खरं आहे. पाणी पिणं केवळ शरीरासाठी गरजेचं नाही, तर अनेक आजारांपासून बचावासाठीही महत्त्वाचं आहे. पाणी पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं, कारण पाणी शरीराला हायड्रेट ठेवतं आणि शरीरातले विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर टाकतं.
शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण असलं तर शरीराचे अवयव नीट काम करतात आणि आजार दूर राहतात. पण काही लोक असे असतात की पाणी पिताच त्यांना लगेच लघवी होते. याकडे दुर्लक्ष करणं हानिकारक ठरू शकतं. कारण, एका सामान्य माणसाच्या ब्लॅडरमध्ये (मूत्राशयात) साधारणतः ३०० ते ५०० मि.ली. पर्यंत लघवी साठवण्याची क्षमता असते. अशा परिस्थितीत पाणी पिताच किंवा वारंवार लघवी होणं हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं.
अपोलो हॉस्पिटल, नोएडा येथील डायबिटीज, थायरॉईड आणि हार्मोन तज्ज्ञ डॉ. बी.के. राय यांनी सांगितले की वारंवार लघवी येणे ही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे ही समस्या असल्यास त्याचं कारण त्वरित शोधणं आवश्यक आहे.
सामान्यतः वारंवार लघवी येणं ही डायबिटीज, युरीन इन्फेक्शन (UTI), प्रोस्टेटची समस्या किंवा ADH हार्मोनच्या कमतरतेमुळे होऊ शकते. तरीदेखील ही समस्या ओळखून वेळेत काळजी घेणं गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, कधी-कधी वारंवार लघवी येणं सामान्य असू शकतं, पण जेव्हा ही सवय बनते किंवा झोपेत अडथळा आणते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही शरीरातल्या एखाद्या गंभीर त्रासाचं लक्षण असू शकते.
दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? (How much time pee is normal)
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, जर एखादा व्यक्ती दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पित असेल, तर दर ३ ते ४ तासांनी लघवीला जाणं हे सामान्य मानलं जातं. याशिवाय, एक निरोगी व्यक्ती दिवसभरात सुमारे ५ ते ७ वेळा लघवीस जाऊ शकतो. पण जर यापेक्षा जास्त वेळा लघवी होत असेल, तर ते सामान्य नाही आणि हे शरीरात एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं.
वारंवार लघवी होण्याची कारणे (Causes of frequent urination)
डायबिटीज: शरीरात साखरेचं प्रमाण (शुगर लेव्हल) जास्त झाल्यावर वारंवार लघवी लागते. टाइप १ आणि टाइप २ दोन्ही प्रकारच्या डायबिटीजमध्ये वारंवार लघवी येणं हे एक सामान्य लक्षण असतं.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) : महिलांमध्ये UTI मुळे वारंवार टॉयलेटला जावं लागतं.
ओव्हरॲक्टिव ब्लॅडर: ही एक न्यूरोलॉजिकल (मेंदूशी संबंधित) स्थिती असते, ज्यामध्ये ब्लॅडरमधील स्नायू वारंवार आकुंचन पावतात, त्यामुळे लगेच आणि वारंवार लघवी लागते.
प्रोस्टेटची समस्या (पुरुषांमध्ये): प्रोस्टेट ग्रंथी मोठी झाल्यावर लघवीच्या नळीवर दबाव येतो, त्यामुळे वारंवार लघवी होते आणि पूर्ण लघवी झाल्यासारखं वाटत नाही.
वारंवार येणारी लघवी कशी रोखायची (How to prevent frequent urination)
पाणी पिण्याची पद्धत सुधारावी: दिवसभरात सुमारे २ ते ३ लिटर पाणी प्या आणि ते हळूहळू करून प्या. एकदम खूप सगळं पाणी पिऊ नये.
काही गोष्टींपासून दूर राहा: वारंवार लघवी येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कॉफी, चहा, कोल्ड ड्रिंक, दारू, तिखट अन्न, आंबट फळं, टोमॅटो आणि चॉकलेट यांसारख्या गोष्टींपासून दूर राहा.
पेल्विक एक्सरसाइज: वारंवार लघवी येण्याच्या त्रासावर आराम मिळवण्यासाठी कीगल एक्सरसाइज उपयुक्त ठरू शकते. यामुळे पेल्विक फ्लोअर स्नायू मजबूत होतात आणि लघवीवर नियंत्रण वाढतं.
वेट लॉस: वजन जास्त असल्यास पोटाचा दबाव मूत्राशयावर येतो, ज्यामुळे वारंवार लघवी लागते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.