Period Leave : मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मुलीना प्रचंड वेदनांना तोंड द्यावे लागते त्या काळात त्यांना आराम मिळावा असं प्रत्येक महिलेला वाटत. मात्र कामावर जाणाऱ्या महिलांकडे काही पर्याय नसतो. या काळात महिलांना सुट्टी मिळावी अशी मागणी होते. काही महिन्यांपूर्वी स्पेनच्या संसदेने महिलांसाठी एक मोठा मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे जगभरात स्वागत झाले. दरम्यान आता युरोपीय देशांमध्ये पीरियड्स रजेची मागणी वाढली आहे.
आता इटलीमध्ये मासिक रजेची मागणी –
इटली हा देखील एक युरोपीय देश आहे. जॉर्जिया मेलोनी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर, येथेही पीरियड्स रजेची मागणी वेगाने वाढली आहे. इटालियन ग्रीन लेफ्ट युतीने एक नवीन विधेयक सादर केले आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मासिक पाळीदरम्यान वेदना होत असल्याने सुटी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आता याबाबतचा निर्णय संसदेने घ्यायचा आहे. संसदेने त्याला मान्यता दिल्यास तो कायदा होईल.
‘या’ देशांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा –
अलिकडेच स्पेनच्या संसदेने महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेता येणार आहे. या निर्णयानुसार, मासिक पाळीच्या काळात महिलांना पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. असा निर्णय घेणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश ठरला आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी देणाऱ्या काही देशांपैकी आता स्पेन हा एक बनला आहे.चीन, कोरिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवानमध्ये दोन दिवसांची सुट्टी देण्याचा कायदा करण्यात आला आहे. त्याच वेळी, हा कायदा जपानमध्ये १९४७ मध्ये बनवला गेला. इतर अनेक देशांमध्येही मासिक रजेबाबत सातत्याने मागणी केली जात आहे.
हेही वाचा – गरोदरपणात चिकन खाताय? थांबा..आधी हे वाचा, जाणून घ्या याचे परिणाम…
सुट्टीत पगार मिळतो का? –
मासिक पाळी हा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. नोकरदार महिलांसाठी मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी होत आहे. स्पेनमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी घेता येणार आहे. मात्र सुट्टीच्या काळात पगार मिळणार की नाही, हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. महिलांना रजा वेतन मिळत नसेल तर अशा कायद्याचा फायदा काय? असा प्रश्न महिला विचारतात.