बहुतेकदा थंडीच्या दिवसांमध्ये आपला टाळू कोरडा पडतो आणि त्यामुळे ही त्वचा निर्जीव दिसते. यामुळे कोंड्याची समस्या वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एकदा कोंडा झाला की त्यातून सुटका करणे खूप कठीण असते. जर तुम्ही सुद्धा कोंडा आणि कोरड्या टाळूमुळे हैराण असाल तर या उपायांचा वापर करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

कोंडा दूर करण्यासाठी ५ नैसर्गिक उपाय

नारळाच्या तेलाचा वापर

केसांसाठी नारळाचे तेल अत्यंत फायदेशीर आहे. खोबरेल तेल त्वचेचे हायड्रेशन सुधारते आणि टाळू कोरडे होत नाही, जे कोंडा होण्याचे मुख्य कारण आहे. रात्री झोपण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल लावा आणि सकाळी शॅम्पूने केस धुवा.

Hair Oil Tips : तुम्हीही केसांना लावण्यासाठी गरम तेलाचा वापर करता का? जाणून घ्या याचे फायदे-तोटे

टी ट्री ऑइलचा वापर

नारळाच्या तेलाप्रमाणेच टी ट्री ऑइलसुद्धा केसांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. यामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे कोंड्यापासून सुटका करून देण्यास मदत करतात. खोबरेल तेलात टी ट्री ऑइलचे २ ते ३ थेंब टाका त्यानंतर हे तेल टाळूला लावा.

कोरफड

कोरफडचा गर केसांना लावून आपण केसांची काळजी घेऊ शकतो. यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे कोंड्यापासून सुटका करून देण्यास मदत करतात. यासाठी कोरफडचा गर काढावा आणि जवळपास ३० मिनिटे टाळूवर लावून ठेवावा. त्यानंतर सौम्य शॅम्पूचा वापर करून केस धुवा. उत्तम परिणामांसाठी, आठवड्यातून दोनदा केसांना कोरफड लावावी.

मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडपेक्षा मेन्स्ट्रुअल कप अधिक उपयुक्त ? जाणून घ्या अधिक तपशील

बेकिंग सोडा

बेकिंग सोडामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होते. ओल्या केसांना बेकिंग सोडा लावून टाळूवर २ ते ३ मिनिटे मसाज करा. काही वेळाने सौम्य शॅम्पूचा वापर करून केस धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने कोंडा दूर होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिंबाचा रस

लिंबाचा रस आम्लयुक्त असतो. यामुळे कोंडा दूर होतो. यासाठी एका भांड्यात पाणी आणि लिंबाचा रस मिसळून केसांची टाळू धुवावी आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावे. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा करू शकता.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)