scorecardresearch

Lip Care Tips: उन्हाळयात ओठांचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी ‘या’ ३ घरगुती पद्धतींचा करा अवलंब

तुम्हालाही सुंदर, गुलाबी आणि मऊ ओठ हवे असतील तर ही माहिती तुमच्या कामाची आहे. बदलत्या ऋतूमध्ये ओठ खूप कोरडे होतात. त्यामुळे ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते.

ओठांचे सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही ओठांकरिता घरगुती मास्क बनवून शकतात. (photo credit: file photo)

तुम्हालाही सुंदर, गुलाबी आणि मऊ ओठ हवे असतील तर ही माहिती तुमच्या कामाची आहे. बदलत्या ऋतूमध्ये ओठ खूप कोरडे होतात. ओठांवर कोरडेपणा इतका वाढतो की कधीकधी ओठांमधून रक्त येऊ लागते. या ऋतूत ओठांची विशेष काळजी घ्यावी लागते. ओठांना नेहमी मऊ ठेवण्यासाठी काही पद्धतींचा अवलंब करावा लागेल. कोणत्या आहेत त्या पद्धती जाणून घेऊयात.

ओठ सुंदर बनवण्याचे उपाय

जास्त पाणी प्यावे

बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या त्वचेसाठी अधिक पाणी पिणे हा सर्वात मोठा इलाज आहे. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे तुमची त्वचा आणि ओठ कोरडे होतात. पाणी तुमचे शरीर हायड्रेट ठेवते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते. यासोबतच पाणी तुमच्या ओठांची आर्द्रता टिकवून ठेवते आणि त्यांना मऊ ठेवते. लक्षात ठेवा की जीभ वारंवार ओठांवर लावू नका, असे केल्याने ओठ अधिक कोरडे होतात.

ओठांसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझर

ज्याप्रमाणे चेहऱ्याच्या त्वचेला उत्तम मॉइश्चरायझरची गरज असते, त्याचप्रमाणे ओठांनाही उत्तम मॉइश्चरायझरची गरज असते. ओठांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बदामाच्या तेलाचा सीरम किंवा खोबरेल तेलाचा सीरम वापरा. हे सिरम तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता. हे सीरम घरी तयार करण्यासाठी, एक चमचे बदाम तेल घ्या. आता व्हिटॅमिन सी कॅप्सूल आणि ग्लिसरीनचे काही थेंब घ्या. या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता हे सिरम रोज झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. असे नियमित केल्याने तुमचे ओठ मुलायम होतील.

ओठांवर लावा हा घरगुती मास्क

ओठांचे सौंदर्य टिकवण्यासाठी तुम्ही घरगुती ओठांकरिता मास्क बनवून शकतात. मास्क बनवण्यासाठी एक चमचा मध घ्या, त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब घाला. चमच्याच्या मदतीने ते ओठांवर लावा आणि सेलोफेनने ओठ झाकून टाका. यामुळे ओठांचा ओलावा टिकून राहील. ओठ जास्त फाटले असतील तर त्यात चिमूटभर हळद टाका. ओठांवर मास्क म्हणून देसी तूपही लावू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pink and beautiful lip care tips how to maintain it to avoid blackness home remedies scsm

ताज्या बातम्या