प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी असते. मात्र कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवाची जयंती असते. या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता असे मानले जाते. या वर्षी, कालभैरव जयंती २७ नोव्हेंबर, शनिवारी येत आहे. या दिवशी भगवान भैरवांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. भगवान भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप आहेत. या दिवशी सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत केले जाते. यानंतर रात्री संपूर्ण विधीपूर्वक कालभैरवाची पूजा केली जाते.
काळभैरव जयंतीनिमित्त पूजन केल्याने माणसाला भीतीपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. कालभैरवाची उपासना केल्याने ग्रहांचे अडथळे आणि शत्रू इत्यादी दोन्हीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार भगवान कालभैरवाचे रूप सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी सदैव कल्याणकारी असते. त्याचबरोबर अनैतिक कृत्य करणाऱ्यांना नेहमीच शिक्षा देतात, अशी धारणा आहे. एवढेच नाही तर भैरवाच्या भक्तांना जो त्रास देतो, त्याला तिन्ही लोकांमध्ये कुठेही आश्रय मिळत नाही, असेही सांगितले जाते.




कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष अष्टमी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु होते. शनिवारी पहाटे ०५.४३ ते २८ नोव्हेंबर २०२१ रविवारी सकाळी ०६.०० पर्यंत राहील. काळभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रत करावे. या दिवशी भगवान शंकरासमोर दिवा लावून पूजा केली जाते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी भगवान कालभैरवाची पूजा करावी, असे मानले जाते. कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन भगवान भैरवाच्या मूर्तीसमोर चारमुखी दिवा लावा आणि त्यांची मनोभावे पूजा करा. देवाला फुले, इमरती, जिलेबी, उडीद, पान, नारळ इत्यादी वस्तू अर्पण करा. यानंतर भगवंताच्या समोर आसनावर बसून कालभैरव चालीसाचा पाठ अवश्य करावा. पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी. तसेच, अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्याची माफी मागावी.