Pressure Cooker Safety Tips: प्रेशर कुकरचा वापर प्रत्येकाच्या घरात मोठ्या प्रमाणात केला जातो. अगदी डाळ-भात बनवण्यापासून ते भाजी शिजवण्यापर्यंत तु्म्ही अनेक पदार्थ बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा सहज वापर करु शकता. खूप कमी वेळात अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरची मदत होते. अन्नातील पोषक तत्वे राखण्यासाठी चवीसोबत आरोग्यासाठीही कूकरमध्ये अन्न शिजवणे खूप चांगले असते. पण प्रेशर कुकरचा वापर तुम्ही निष्काळजीपणे करत असाल तर ते अपघाताचे कारण बनू शकते. त्यामुळे प्रेशर कुकरचा वापर कसा करायचा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची जाणून घ्या.

प्रेशर कुकर वापरण्यापूर्वी ‘या’ १० गोष्टींची घ्या काळजी

१) कुकर वापरण्यापूर्वी गॅस मोठा नसावा की त्यातून निघणारी आग साइज वॉलवर जाईल. गॅसचा फ्लेम नेहमी खालच्या सर्फेसवर असावी.

२) कुकर गॅसवर असताना शिट्टी झाल्यास स्टीलच्या चमच्याने किंवा चाळणीने मारू नका, असे केल्याने प्रेशर कुकरमधील प्रेशर सहज बाहेर पडू लागेल.

३) कुकरमध्ये कोरड्या गोष्टी कधीही शिजवण्याचा प्रयत्न करू नका. कारण कुकरमध्ये अन्न शिजवताना किमान ३०० मिली पाणी किंवा द्रव असणे आवश्यक असते. जास्त पाणी वापरणेही धोकादायक ठरु शकते.

४) पदार्थ तळण्यासाठी प्रेशर कुकचा वापर करु नका. कारण कुकर अन्न शिजवण्यासाठी वापरला जातो, त्यामुळे त्यात पदार्थ तळून तो खराब होऊ शकतो.

५) गरम प्रेशर कुकर जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करू नका. वाफ पूर्णपणे बाहेर येईपर्यंत त्याचे झाकण शक्ती वापरू उघडू नका.

६) कुकर वापरल्यानंतर नेहमी साबण आणि कोमट पाण्याने धुवून पूर्णपणे स्वच्छ करा. कुकरचा प्रत्येक भाग स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

७) प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हमध्ये काही गडबड अर्थात खराब झाल्यास तो बदलून घ्या.

८) कडक पाणी किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे कुकरवर पांढरे डाग पडत असतील तर व्हिनेगर आणि लिंबाच्या मदतीने स्वच्छ करा.

९) जर अन्न कुकरला चिकटून कोरडे झाले असेल तर ते कोमट किंवा सामान्य पाण्यात काही वेळ बुडवून ठेवा. कुकर खूप घासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०) कुकर साफ करण्यासाठी मेटल स्कॉच अजिबात वापरू नका .