येणारा काळ हा Earbuds किंवा AirPods चा असेल असं दिसतंय. मंगळवारी रिअलमी कंपनीने भारतात realme Buds Air लाँच केले, आणि आता टेक्नोलॉजी आणि लाइफस्टाइल ब्रँड ‘pTron’ ने भारतात आपले कमी किंमतीतील Wireless Earbuds लाँच केले आहेत.

कंपनीने pTron Bassbuds Lite लाँच केले असून व्हाइट आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हे उपलब्ध आहेत. याची किंमत केवळ 899 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या किंमतीत आतापर्यंत एखाद्या चांगल्या कंपनीचे इअरफोन खरेदी करता येत होते, पण आता तेवढ्याच किंमतीत इअरबड्स खरेदी करता येणार आहेत. अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन हे Earbuds खरेदी करता येतील. या इअरबड्सच्या किंमतीत भारतात एखाद्या चांगल्या कंपनीचे इअरफोन उपलब्ध असतात.  केवळ दीड तासांमध्ये हे Earbuds पूर्ण चार्ज होतील आणि 20 तासांचा बॅकअप मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. pTron Bassbuds Lite सह 400mAh क्षमतेची चार्जिंग केस मिळते.

Earbuds मध्ये हाय-स्टीरियो साउंड असून यामध्ये 10एमएम डायनॅमिक स्पीकर यूनिट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट मिळेल. या डिव्हाइसवर एक वर्षाची वॉरंटी ऑफर असून याची रेंज 10 मीटर पर्यंत आहे. यामध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट असून अँड्रॉइड आणि आयफोनसह वापर करता येईल. तसंच, यात एक मल्टी फंक्शन बटणही आहे. याद्वारे तुम्ही कॉल कट करु शकतात किंवा उचलू शकतात. याच बटणाद्वारे Bassbuds Lite मधील गुगल असिस्टंट अ‍ॅक्टिव्ह होतं आणि आयफोन वापरत असाल तर याच बटणाद्वारे Siri अ‍ॅक्टिव्ह होईल.