भितीमुळे कित्येक लोकांना व्यक्त होता येत नाही. मनातले विचार हे मनातच राहून जातात. प्रेझेन्टेशन, भाषण देण्याची इच्छा असते, पण लोक काय म्हणतील, आपली तयारी नीट झाली असेल की नाही, हे प्रश्न सतत मनात येत असल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि लोकांसमोर व्यक्त होण्याचे राहून जाते. पण, या समस्येवर तुम्ही मात करू शकता. भाषण देताना किंवा प्रेझेन्टेशन देताना भिती वाटू नये यासाठी आज काही उपाय तुम्हाला सूचवत आहोत. याने लोकांपुढे व्यक्त होण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) अभ्यास करणे

कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी त्याबाबतचे ज्ञान आवश्यक आहे. विषयाची माहिती नसल्यास त्याबाबत लोकांपुढे बोलण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास मिळत नाही. त्यामुळे, विषयाची माहिती घ्या. याने प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

२) नातेवाईकांपुढे बोला

विषयाची माहिती असूनही तुम्हाला भिती वाटत असेल तर तुम्ही घरच्यांपुढे बोलण्याची प्रॅक्टिस करा. याद्वारे सर्वांसमोर बोलण्याबाबत वाटणारी भिती घालवण्यात मदत होईल. कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांसमोर बोलण्याची प्रॅक्टिस करा, याने नंतर भाषण किंवा प्रेझेन्टेशन देणे सोपे जाईल.

(उच्च कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतात हृदयाचे विकार, कमी करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश)

३) आरशा समोर बोला

प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आरशाचा वापर करू शकता. आरशा समोर उभे राहून भाषण किंवा प्रेझेन्टेशन द्या. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि लोकांपुढे जण्यासाठी हिंमत मिळेल.

४) रेकॉर्ड करून ऐका

भाषण रेकॉर्ड करा आणि ते ऐका. याने आवाजातील चढ उतार बरोबर करण्यात तुम्हाला मदत होईल. भाषण देताना पॉझेस, आवाजाचा चढ उतार हे अनेक गोष्टी सूचवतात. त्यामुळे रेकॉर्ड करून आपले भाषण तपासा.

५) आपल्या आवडीचा विषय निवडा

लोकांपुढे काय बोलावे. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर काय देणार, अशा अनेक प्रश्नांनी भिती निर्माण होते. ही भिती घालवण्यासाठी आणि हिंमतीने बोलण्यासाठी आपल्या आवडीचा विषय निवडा. आवडीच्या विषायाबाबत आधीच माहिती असल्याने बोलणे सोपे जाते आणि भिती वाटत नाही.

(सावध व्हा.. ‘या’ संसर्गामुळे महिलेला झाले सेप्सिस, गमवावे लागले हात आणि पाय)

६) श्रोत्यांकडे लक्ष देऊ नका

भाषण किंवा प्रेझेन्टेशन देताना लोकांकडे लक्ष देऊ नका. आपले लक्ष विषयावर असू द्या. बोलताना आपण काय बोलत आहोत, आपले हावभाव कसे आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे.

७) अधिक बोलणे टाळा

भाषण देताना किंवा प्रेझेन्टेशन देताना अधिक बोलणे टाळले पाहिजे. अधिक बोलताना व्यक्ती अडखळण्याची शक्यता असते, ज्यामुळे लवकर बोलण्याचा प्रयत्न होतो. या दरम्यान श्वास कमी घेतला जातो आणि चिंता होते. परिणामी भाषण बिगडू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public speaking tips to avoid fear during speech and presentation ssb
First published on: 13-10-2022 at 13:54 IST