Raw Mango Pickle Recipe Marathi Video: उन्हाळा आला की वाळवणाचे, साठवणीचे पदार्थ करायची लगबग सुरु होते. अगदी पूर्वीसारखं पाच- सहा किलोच्या प्रमाणात नाही तरी निदान एखादा किलो पापड, किलोभर लोणचं करायची हौस अनेकांना असते. बाजारात मिळणाऱ्या आंबटढोण लोणच्याची तुलना घरच्या झणझणीत व चविष्ट लोणच्याशी होऊच शकत नाही आणि म्हणूनच कदाचित हा खटाटोप केला जात असावा. आता तुमची घरगुती लोणच्याची इच्छाही पूर्ण व्हावी व त्यात कष्टही कमी व्हावे यासाठी काही टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. कमी तेलात, चटपटीत लोणचं कसं बनवावं हे जाणून घेऊया..

कैरीचं झटपट लोणचं साहित्य

अर्धा किलो कैरी
७५ ग्रॅम मीठ (सैंधव मीठ असल्यास उत्तम)
४०-५० ग्रॅम काश्मिरी लाल तिखट
अर्धा टीस्पून हळद पावडर
१ टीस्पून कोरडे भाजलेले मेथी दाणे

फोडणीसाठी –
५० मिली तिळाचे तेल/तुमच्या आवडीनुसार तेल वापरले तरी चालेल पण तिळाच्या तेलाने खमंग सुगंध येतो व चवही मिळते.
१ चिमूट हिंग
१.५ चमचे मोहरीची डाळ

आंबे चांगले धुवा आणि कापडाने पुसून पूर्णपणे कोरडे करा. लक्षात ठेवा आंब्यामध्ये अजिबात ओलावा नसावा अन्यथा लोणचे लवकर खराब होईल.
आंब्याचे अगदी लहान तुकडे करून बारीक चिरून घ्या.
मीठ, तिखट, हळद घाला.
मेथीचे दाणे व मोहरीची डाळ कोरडी भाजून घ्या.
आंब्यामध्ये घाला आणि सर्व नीट मिसळा.
एका छोट्या कढईत तिळाचे तेल गरम करून त्यात हिंग व नंतर मोहरी घाला.
फोडणी चिरलेल्या कैरीवर ओतून घ्या.
तुम्ही दोन दिवस हे लोणचं मुरण्यासाठी ठेवा
मग काचेच्या बरणीत भरून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता.

हे ही वाचा<< आंबा खाल्ल्याने मधुमेहापासून वजन कमी करण्यापर्यंत होऊ शकतो फायदा; पण ‘ही’ खाण्याची पद्धत व रेसिपी नीट बघा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लक्षात ठेवा वरील प्रमाण हे अर्ध्या किलो कैरीच्या लोणच्यासाठीचे आहे जर आपण जास्त प्रमाणात लोणचे बनवणार असाल तर त्यानुसार प्रमाण घ्यावे. लोणचं टिकण्यासाठी बनवून झाल्यावर बरणीत भरताना त्यात वरून पुन्हा तेल घालू शकता.