Perfect Way To Eat Sprouts: वजन कमी करायचा किंवा हृदयाचे आरोग्य सुधारण्याचा विचार असो तुम्हाला आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर थेट दिसून येत असल्यानेच बहुदा तुम्ही जे खाता तसेच दिसता, राहता वागता असेही म्हटले जाते. तुम्हाला अगदी पालापाचोळा किंवा नुसत्या कच्च्या भाज्या खाऊन राहायचं नसेल तरीही तुम्ही शरीराला सुदृढ ठेवू शकता. हे काम करण्यात आजवर अनेकांना मदतीचा हात ठरलेली गोष्ट म्हणजे स्प्राऊट्स. साध्या भाषेत सांगायचं तर मोड आलेले कडधान्य.

महाराष्ट्रात कडधान्याच्या उसळी अत्यंत प्रसिद्ध आहेत. एरवी उसळीसाठी वापरलं जाणारं कडधान्य नेमकं कसं खाल्ल्याने अधिक फायदा मिळू शकतो हे आता आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

डॉ. आयलीन कॅंडे, एचओडी, पोषण आणि आहारशास्त्र, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल, मुंबई यांनी सांगितले की, “ एखाद्या कडधान्याला कोंब फुटताना त्यातील पोषक सत्वांचे प्रमाण वाढत असते. स्प्राउट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने, ते पोस्ट-प्रांडियल रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास, पचन सुधारण्यास मदत करतात. “

डॉ कँडे यांच्या संशोधनात सुद्धा याविषयी माहिती समोर आली आहे. स्प्राउट्स शरीरातील एचडीएल (हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन) पातळी ‘चांगले कोलेस्टेरॉल’ वाढवण्यास मदत करू शकतात, जे हृदयाचे आरोग्य वाढवते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते, असा त्यांचा अभ्यास आहे.

पण स्प्राऊट्स खाण्याची योग्य पद्धत कोणती?

डॉ कँडे यांच्या मते, स्प्राऊट्स उकळून खाणे चांगले. त्याची अनेक कारणे आहेत. सेवन करण्यापूर्वी स्प्राउट्स वाफवण्याचा किंवा शिजवण्याचा सल्ला देण्याचे पहिले कारण म्हणजे, कोंब येण्याच्या प्रक्रियेत अनेकदा साल्मोनेला आणि ई.कोली सारख्या सूक्ष्मजंतूंनी कडधान्य दूषित होऊ शकतात, शिवाय कडधान्य भिजवलेली असताना ओलसर आणि दमट वातावरणात अंकुरित होतात, त्यामुळे यातून विषबाधा होऊ शकते. वाफवल्याने हे दूषित घटक दूर होऊन तुम्हाला अधिक फायदे मिळतात.

हे ही वाचा<<पावसाळी चप्पला लागून पायाला जखमा होतायत? ‘या’ सोप्या टिप्सने त्रास व पैसे दोन्ही वाचवा

खाण्यापूर्वी स्प्राउट्स उकळल्यास किंवा शिजवल्यास फायबर सत्व शरीराला अधिक प्रमाणात मिळू शकते व त्यामुळे पचनक्षमता सुधारू शकतेशकते, असे डॉ याउलट, कच्चे स्प्राउट्स आपल्या शरीरासाठी पचण्यास कठीण असतात. विशेषत: संवेदनशील आणि कमकुवत आतडे असलेल्या लोकांना कच्च्या स्प्राऊट्समुळे सूज येणे, ओटीपोटात दुखणे किंवा अतिसार असे त्रास होऊ शकतात. गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांनी कच्च्या स्प्राउट्सचे सेवन करायचे झाल्यास अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे, असेही डॉ. कॅंडे यांनी सांगितले आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित, अवलंब करण्याआधी वैद्यकी सल्ला नक्की घेऊ शकता)