रियलमी कंपनीने स्वस्त आणि मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर आता प्रिमियम सेंगमेंटकडे मोर्चा वळवला आहे. कंपनी येत्या काही दिवसात ६० हजार रुपयांपर्यंतचा फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने OnePlus, Vivo, Oppo, IQ आणि अधिक यांसारख्या इतर ब्रँडशी स्पर्धा करण्यासाठी जीटी सिरिज सुरु केली आहे. आता कंपनी सॅमसंग, आयफोन आणि पिक्सेल स्मार्टफोनला टक्कर देण्याासाठी तयारी करत आहे.

रियलमीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८९८ चिपसेट असण्याची शक्यता आहे. शिवाय, कंपनी १२५ W मोबाईल वेगाने चार्ज करण्याची सुविधा देऊ शकते. या व्यतिरिक्त हाय कॅमेरा मॉड्यूल, अल्ट्रा वाइड अँगल आणि टेलीफोटो लेंस स्मार्टफोन लावण्याची तयारी करत आहे. रियलमीचे संस्थापक स्काय ली यांनी स्मार्टफोन कधी लॉन्च होईल, याबाबतची माहिती दिलेली नाही. मात्र २०२२ हा स्मार्टफोन लॉन्च होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अजूनही नवा अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन कधी मिळणार याबाबत माहिती नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, कंपनी भारतात आपलं जाळं पसरवण्यावर काम करत आहे. कंपनीने देशात आता २०० एक्सक्लूसिव स्टोर खोलले आहेत. १३ नोव्हेंबर २०२१ पासून सर्व स्टोर्स सुरु आहेत. “रियलमीचे स्टोर्स जाळं घट्ट विणण्यास मदत करेल. आम्ही आमच्या ग्राहकांना चांगलं उत्पादन देण्याचं प्रयत्न करत आहोत.”, असं रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ यांनी सांगितलं.