स्मार्टफोन मार्केटमधील आघाडीची कंपनी Xiaomi ने अलिकडेच भारतात लेटेस्ट Redmi Note 10 Series मध्ये तीन शानदार स्मार्टफोन लाँच केले. नवीन सीरिजमधील स्मार्टफोन आणल्यानंतर आता कंपनीने आधीच्या सीरिजमधील फोनच्या किंमतीत कपात केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात लाँच झालेला कंपनीचा Redmi Note 9 स्मार्टफोन आता स्वस्त झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Redmi Note 9 स्पेसिफिकेशन्स :-
ड्युअल-सिम रेडमी नोट 9 अँड्रॉइड 10 वर आधारित MIUI 11 वर कार्यरत आहे. यात 6.53 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) आयपीएस डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फिंगरप्रिंट सेन्सर फीचर असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेस असून 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे पर्याय आहेत. इनबिल्ट स्टोरेजसाठी 64 जीबी आणि 128 जीबी असे दोन पर्याय मिळतील. आवश्यकता असल्यास माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. रेडमी नोट 9 सीरिजच्या अन्य फोनप्रमाणे यातही क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यात 48 मेगापिक्सलचा Samsung GM1 प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेराही आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह Redmi Note 9 मध्ये 5,020 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, युएसबी टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, 3.5 एमएम ऑडियो जॅक, एनएफसी, इन्फ्रारेड ब्लास्टर, जीपीएस आणि ए-जीपीएस यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Redmi Note 9 नवीन किंमत :-
शाओमीने Redmi Note 9 च्या तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. रेडमी नोट 9 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची लाँचिंगवेळी किंमत 11 हजार 999 रुपये होती, पण आता किंमतीत 1,000 रुपयांची कपात झाल्यामुळे हा फोन 10 हजार 999 रुपयांत खरेदी करता येईल. तर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत 500 रुपयांची कपात झाली असून याची किंमत आता 12 हजार 999 रुपये झाली आहे. याशिवाय 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीतही 1000 रुपयांची कपात झाल्याने याची किंमत आता 13 हजार 999 रुपये झाली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi note 9 price cut in india after launch of redmi note 10 series check new price sas
First published on: 06-03-2021 at 16:06 IST