Kitchen jugad: भेंडीची भाजी सर्वांच्याच घरी खाल्ली जाते. भेंडीची भाजी कधी गचगचीत होते तर कधी चव बिघडते. पण तुम्ही कधी भेंडीत बर्फ टाकून पाहिला आहे का? म्हणजे बर्फ टाकून कधी भेंडीची भाजी तुम्ही बनवली आहे का? भेंडीमध्ये बर्फ टाकण्याचा मोठा फायदा आहे. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भेंडीत बर्फ टाकून पाहिला आहे का?

तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय, जो तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.

भेंडीमध्ये बर्फ टाकण्याचा काय फायदा आहे?

भेंडी खायला काही लोकांना आवडते तर काही लोकांना आवडत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की ही छोटीशी भेंडी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण भेंडीची भाजी तुमचे अनेक आजार बरे करण्याचे काम करते. त्यामुळे जर तुम्ही भेंडी खात नसाल तर लगेचच तुमच्या आहारात भेंडीचा समावेश करा. अशी ही भरपूर पोषण मूल्य असलेली भेंडी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली असेल पण बर्फ टाकून बनवली नसेलच. आता बर्फ टाकून भेंडीची भाजी कशी करायची, भेंडीमध्ये बर्फ टाकण्याचा काय फायदा आहे? असे प्रश्न तुम्हालाही पडलेच असतील. चला तर मग जाणून घेऊयात.

नेमकं काय करायचं?

गृहिणीनं व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका भांड्यात थोडं पाणी घ्या, त्यात सगळी भेंडी टाका. याच पाण्यात तुम्हाला बर्फाचे तुकडे टाकायचे आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> उन्हामुळे पायावर चप्पलांचे डाग पडलेत? ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा, पायाची त्वचा होईल छान

याचा काय फायदा होणार?

बऱ्याचवेळा तुम्हाला माहितीच असेल की, भेंडी थोडी नरम पडते. तिच्यात जीवच नाही असं वाटतं. अशा भेंडीची भाजी केल्यासही तिची हवी तशी चव लागत नाही. पण जर का तुम्ही भेंडीत बर्फ टाकला आणि त्या पाण्यातून तुम्ही भेंडी बाहेर काढलात तर फरक तुम्हाला दिसून येईल. भेंडी अगदी ताजी वाटेल.

Didi ye kaise karu या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.