Lung Cancer Prevention Drinks: फुप्फुस हे आपल्या शरीराचं ऑक्सिजनचं प्रमुख केंद्र आहे. हे अवयव रक्तामध्ये प्राणवायू मिसळून शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा पुरवतात आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. पण आजच्या प्रदूषित वातावरणात, धूम्रपान, बदलते हवामान व अनारोग्यकारक जीवनशैली यांमुळे फुप्फुसावर प्रचंड ताण येतोय. त्यामुळे फुप्फुसाशी संबंधित आजार आणि कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढत आहे.
आयुर्वेद व युनानी वैद्यक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलं आहे की, फुप्फुस निरोगी ठेवण्यासाठी काही हर्बल ड्रिंक्स अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. या नैसर्गिक पेयांमुळे फुप्फुसांतील घाण, कफ आणि विषारी घटक बाहेर पडतात, तसेच फुप्फुसांची ताकद वाढते.
फुप्फुसांची सफाई आणि कॅन्सरपासून बचाव डॉक्टरांनी सांगितली ‘ही’ ४ जादूई पेयं
१. ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात आणि त्यातील कमी कॅफिन फुप्फुसातील सूज कमी करण्यात मदत करते. हे पेय शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते, रक्त शुद्ध करते आणि श्वसन तंत्र मजबूत करते. दररोज ग्रीन टी घेतल्याने फुप्फुस व्यवस्थित काम करते आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण मिळते.
२. आले, मध व लिंबाचा चहा
आले हे नैसर्गिक सूजनरोधी आणि जंतुनाशक आहे. मध घशातील खरखर आणि कोरडेपणा कमी करतो, तर लिंबातील व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो. या तिन्ही घटकांचा चहा सर्दी, खोकला व कफ कमी करून श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतो. त्यामुळे श्वास घेणे सुलभ होते आणि फुप्फुसांवरील ताण कमी होतो.
३. हळद आणि आले यांचा काढा
हळदीतील कर्क्युमिन आणि आल्यातील जिंजरॉल हे दोन शक्तिशाली घटक सूज आणि संक्रमण कमी करतात. या दोन्हींचा काढा किंवा चहा घेतल्याने फुप्फुसांमधील कफ बाहेर पडतो. संसर्गाचा धोका कमी होतो आणि श्वास घेणे सहज होते. ज्यांना वारंवार सर्दी-जुकाम किंवा दम्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे.
४. मुलेठीचा चहा
मुलेठी हे एक गोड चवीचे औषधी मूळ आहे, जे आयुर्वेदात खूप जुने आणि प्रभावी औषध मानले जाते. मुलेठीच्या मुळांमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीमायक्रोबियल गुण असतात. हा चहा घशातील सूज कमी करतो, कफ सैल करून बाहेर काढतो आणि श्वसनतंत्रातील अडथळे दूर करतो. वारंवार सर्दी, खोकला किंवा दम्याने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा चहा फुप्फुसांची स्वच्छता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवतो.
डॉक्टरांचा इशारा:
“आजच्या प्रदूषणयुक्त वातावरणात फुप्फुसांमध्ये घाण साचणं ही गंभीर बाब आहे. हीच घाण पुढे कर्करोग किंवा दमा यांसारख्या जीवघेण्या आजाराचं कारण ठरू शकते. त्यामुळे शरीराचं डिटॉक्स करणं आणि फुप्फुस स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे,” असं डॉ. जैदी सांगतात.
सावध राहा! फुप्फुस स्वच्छ ठेवायचं असेल, तर या ४ हर्बल ड्रिंक्सचा समावेश आजच करा… नाही तर श्वास घेणंही होईल कठीण!
