पती-पत्नीमधील नाते प्रेम, विश्वास आणि आदर या नाजूक धाग्याने बांधलेले असते. यापैकी एका गोष्टीचाही अभाव असेल तर नाते तुटू शकते. अनेकवेळा एकमेकांवर प्रेम असूनही जाणते- अजाणतेपणाने जोडप्यांमध्ये अशा अनेक चुका होतात, ज्यामुळे त्यांचे नाते कमकुवत होते. यापैकी एक चूक म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्द्ल नातेवाईकांसमोर अशा काही गोष्ट बोलतात, ज्या सर्वांसमोर न बोलणे अपेक्षित असते. पण, तुम्ही चुकून त्या बोलून जाता; ज्यामुळे जोडीदार खूप दुखावतो. यातील तीन गोष्टी आपण जाणून घेऊ….
सर्वांना जोडीदाराच्या उणीवा सांगणे
पती-पत्नीमधील गोष्टी नातेवाईकांपर्यंत पोहोचतात, तेव्हा त्या गोष्टी खाजगी न राहता सार्वजनिक होतात. भलेही तुम्ही ती गोष्ट एखाद्यासा आपले समजून शेअर केली असेल, पण हळूहळू सगळ्यांना समजते. यामुळे लोक जोडीदाराची खिल्ली उडवतात किंवा त्या गोष्टींबद्दल बोलतात. यावरून बरेचदा तुमच्या दोघांमध्ये भांडण होते. ज्यामुळे तुमचा जोडीदार भावनिकरित्या दुखावला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणत्याही गोष्टी इतरांबरोबर शेअर न करण्याचा प्रयत्न करा.
जोडीदाराचा कुटुंबातील सदस्यांनी आदर करणे
जर तुमचा जोडीदार तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा आदर करत असेल, तर त्याच्या कुटुंबालाही तोच सन्मान देणे तुमचे कर्तव्य बनते. आपल्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल कोणत्याही नातेवाईकांसमोर कधीही वाईट बोलू नका. तुमच्या या सवयींबद्दल तुम्हाला कळताच तुमच्या पार्टनरचा तुमच्यावरील विश्वास उडेल.
रागाच्या भरात चुकीचे बोलणे टाळा
रागाच्या भरात जोडीदार काहीही बोलतो. तो काहीही विचार न करता सगळ्यांसमोर जोडीदाराला ओरडतो. पण, रागात बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. अनेकवेळा माणूस रागाच्या भरात अशा अनेक चुका करतो ज्यावर माफी मागणेही कठीण होऊन बसते. अशावेळी रागाच्या भरातही नातेवाईकांसमोर जोडीदाराला चुकीचे बोलू नका.