Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच आपल्या ग्राहकांना Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन एका वर्षापर्यंत मोफत देणार असल्याची माहिती एका टीझर पोस्टद्वारे दिली होती. पण, त्यावेळी ही ऑफर कोणत्या प्लॅनमध्ये मिळेल याबाबत कंपनीने माहिती दिली नव्हती. आता Jio ने या प्लॅन्सबाबतची माहिती सार्वजनिक केली आहे.

जिओ आपल्या सर्व प्रीपेड युजर्सना चार प्लॅन्समध्ये ही ऑफर देत आहे. हे प्लॅन आहेत – 401 रुपयांचा प्लॅन, 2,599 रुपयांचा प्लॅन, 612 रुपयांचे डेटा व्हाउचर आणि 1208 रुपयांचे डेटा व्हाउचर. Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शनची किंमत 399 रुपये आहे. पण, वरील सर्व प्लॅन्समध्ये जिओ Disney+ Hotstar VIP ची सुविधा एका वर्षासाठी मोफत देत आहे. यातील 401 आणि 2,588 रुपयांचे दोन्ही प्लॅन न्यू-ब्रँडेड रिचार्ज प्लॅन आहेत. यामध्ये Disney+ हॉटस्टार व्हीआयपीशिवाय अन्य अनेक लाभ मिळतात.


401 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 3 जीबी 4जी डेटा, 6 जीबी अतिरिक्त 4जी डेटा, जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग, जिओ टू लँडलाइन अनलिमिटेड कॉलिंग, जिओ टू अन्य मोबाइल नेटवर्कवर 1000 मिनिटे आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. दुसरीकडे 2,588 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी 4जी डेटा, 10 जीबी अतिरिक्त 4जी डेटा, जिओ-टू-जिओ अनलिमिटेड कॉलिंग, जिओ टू लँडलाइन अनलिमिटेड कॉलिंग, जिओ टू अन्य मोबाइल नेटवर्कवर 1000 मिनिटे आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. याशिवाय, जर तुम्हाला रिचार्ज प्लॅन नको असेल आणि केवळ अतिरिक्त डेटा घ्यायचा असेल, तर तुम्ही 612 रुपये आणि 1,208 रुपयांच्या डेटा व्हाउचरवर एक वर्षापर्यंत मोफत, Disney+ हॉटस्टार व्हीआयपी सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 612 रुपयांच्या व्हाउचरमध्ये 72 जीबी हाय-स्पीड डेटा आणि जिओ टू अन्य मोबाइल नेटवर्कवर 6,000 मिनिटे मिळतात. तुमच्या अॅक्टिव्ह प्लॅनइतकी वैधता 612 रुपयांच्या व्हाउचरमध्ये मिळेल. तर, 1,208 रुपयांच्या व्हाउचरमध्ये 240 दिवसांच्या वैधतेसह 240 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल.