कधीतरी आवरत असताना अचानक आपल्याला डोक्यावर पांढरे केस दिसायला लागले की आपण एकदम चक्रावतो. माझे वय तर इतके लहान असताना माझ्या डोक्यावर हे पांढरे केस कसे काय दिसायला लागले असे आपल्याला वाटायला लागते. पण एकदा केस पांढरे झाल्यावर काहीच करता येत नाही. मग उरलेले केस पांढरे होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेणे आपल्या हातात असते. त्यासाठी मग हेअरडाय, मेहंदी, कलरींग असे उपाय वापरले जातात. मात्र केस पांढरे होऊच नयेत आणि झाले असतील तरी बाकीचे होऊ नयेत यासाठी काही घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात काय आहेत हे उपाय…

कांदा आणि लिंबू – कांद्याचे सौंदर्याच्यादृष्टीने अनेक उपयोग आहेत. पांढरे केस रोखण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यामध्ये लिंबाचा रस घाला. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवर याचा चांगला उपयोग होतो. ही घट्ट पेस्ट केसांच्या मूळांना आणि पांढऱ्या केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. यामुळे पाढरेपणा कमी होण्यास मदत होईल.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

आवळा आणि बदाम तेल – आवळा हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पिकणारे आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे फळ आहे. केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकून रहावा यासाठी आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आवळ्याचा रस आणि बदाम तेल एकत्र करुन त्याने केसांना मसाज केल्यास त्याचा केसांचा पोत सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो.

ताक – ताक आरोग्यासाठी चांगले असते असे आपण अनेकदा ऐकतो. ताक प्यायल्याने अन्नपचनही चांगले होते हे आपल्याला माहित आहे. मात्र हेच ताक केसांच्या वाढीसाठी आणि इतर समस्यांसाठीही उपयुक्त असते. ताकाने केस धुतल्यास मूळे आणि पोत सुधारण्यास मदत होते. याशिवाय अकाली केस पांढरे होत असल्याची समस्या सतावत असेल तर एका वाटीत ताक घ्या. त्यामध्ये कडिपत्त्याच्या पानांचा रस घाला. हे मिश्रण थोडे घट्ट होण्यासाठी यामध्ये थोडे दही घाला. हे मिश्रण केसांना लावून चांगल्या पद्धतीने मसाज केल्यास केसांचा रंग बदलण्यास मदत होते. अर्धा तास हे मिश्रण लावून ठेऊन नंतर केस धुवून टाका.

कडिपत्ता आणि खोबरेल तेल – केस पांढरे झाल्यामुळे आपल्याला मित्र-मैत्रीणींकडून म्हातारे म्हणून चिडवले जाते. पण आपल्या आहारात उपयुक्त असणारा कडिपत्ता केस काळे होण्यासाठीही उपयुक्त असतो. कडिपत्त्याची पेस्ट करुन त्यामध्ये खोबरेल तेल घालून हे मिश्रण केसांना लावावे. केसांच्या मूळांना हे मिश्रण लावल्यास पांढरे केस येणे मूळातूनच कमी होते.