Salad For Weight Loss : सॅलड सकस आहारासाठी एक उत्तम खाद्यपदार्थ आहे. सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रियन्ट्स असतात. त्यामुळ सॅलड खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात. सॅलड चविष्ट तर असतंच पण ते खूप सोप्या पद्धतीनेही बनवलं जाऊ शकतं. जर तुम्हाला वजन घटवायचं असेल, तर दुपारचं जेवण स्कीप करून सॅलडचं सेवन करु शकता. कारण लंचमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरीज असलेल्या पदार्थांचं सेवन करता. त्यामुळे तुमचं वजन वाढण्यास मदत मिळते. पण हेच जर तुम्ही जेवणाच्या वेळी सॅलडचं सेवन केलं, तर तुमचं वजन घटू शकतं. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहाराचे नियोजन करत असाल, तर तुम्ही हेल्दी सॅलडचं सेवन करायला पाहिजे. जाणून घेऊयात कोणत्या प्रकारचं सॅलड आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरु शकतं.

ग्रीक सॅलड

ग्रीक सॅलड हे क्लासिक आणि मेडिटेरीयन सॅलड असून याच्या सेवनाने आरोग्यास फायदा होतो. यामध्ये टोमॅटो, काकडी, लाल कांदा, कालमॅटा ओलाईव्ज, फिटा चीज यांचा समावेश असतो. तसंच हे सॅलड बनवताना तुम्ही ओलाईव ऑईल, लेमन ज्यूस आणि ओरेगॅनो वनस्पतीचाही वापर करु शकता

अव्होकाडोसोबत ग्रिल्ड चिकन सॅलड

या सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन आणि हेल्दी फॅट्स असतात. यामध्ये चेरी टॉमेटो, काकडी, फिटा चीज यांचा समावेश असतो. या सॅलडचं सेवन केल्यावर शरीरासाठी आवश्यक प्रोटिन्स मिळतं. या सॅलडच्या सेवनाने आरोग्यास अनेक प्रकारचे फायदे होतात.

नक्की वाचा – शरीरात कोलेस्ट्रोलचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय? कोलेस्ट्रोलच्या समस्येवर या गोष्टी ठरु शकतात रामबाण उपाय

भाजलेल्या भाज्यांसोबत क्विनाओ सॅलड

क्विनाओ सॅलडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स आणि फायबर असतं. लंचसाठी हे सॅलड एक उत्तम पर्याय ठरु शकतं. रताळे, शिमला मिरची आणि ब्रोकोली भाजून घेऊन क्विनाओ सॅलडमध्ये मिक्स करा. थोडी पुदीन्याची आणि ओव्याची पाने त्यात मिक्स करा. तसंच हे सॅलड बनवताना ओलाईव ऑईल, लेमन ज्यूस आणि मधाचा वापर करा.

कॉब सॅलड

कॉब सॅलडमध्ये खूप जास्त प्रोटिन्स असतात. यामध्ये ग्रिल्ड चिकन, उकडलेली अंडी, अव्होकाडो, बॅकन, टॉमेटो आणि ब्लू चीजसा समावेश असतो. हे सॅलड खूप चविष्ट आणि चमचमीत असतं. या सॅलडच्या सेवनामुळंही आरोग्याला फायदा होऊ शकतो.

ग्रिन्ससोबत ट्यूना सॅलड

ट्यूना सॅलडमध्ये ग्रिन्स आणि दह्याचा वापर केल्यानं ते अधिक चविष्ट बनतं. ट्यूना सलाड झटपट बनवता येतो. तसंच दुपारच्या जेवणासाठी तुम्ही या सॅडलचं सेवन करु शकता. लाल कांदा आणि लेमन ज्यूसचाही या सॅलडमध्ये वापर करु शकता. तसेच काकडी आणि टॉमेटोसोबत ग्रिन्सचा समावेश केल्यावर हे सॅलड अधिक चांगलं बनतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेनबो सॅलडसोबत चणे

रेनबो सॅलडमध्ये हिरव्या भाज्या, लाल कोबी, गाजर आणि शिमला मिरचीचा समावेश असतो. तसेच यामध्ये चण्यांच्या समावेश केल्यावर शरीराला प्रोटिन्स मिळण्यास मदत होते. साध्या ओलाईवर ऑईलमध्ये आणि व्हिनेगारमध्ये हे सॅलड बनवू शकता.