भारतीय बाजारात दररोज नवीन इलेक्ट्रिक स्कूटर-बाईक आणि कार लाँच होत आहेत. ज्यात आता रिव्हॉल्ट मोटर्सने देखील त्यांची नवीन इलेक्ट्रिक बाईक भारतात लवकरच लॉंच करणार आहे. रिव्हॉल्ट मोटर्सने लॉंच होणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक Revolt RV 400 चा टीझर रिलीज केला आहे . त्यानंतर दिवाळीला ही बाईक बाजारात येण्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत.

यासोबतच कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकची प्री-बुकिंगही सुरू केली आहे. ज्यामध्ये ही बाईक खरेदी करणारे इच्छुक ग्राहक २१ ऑक्टोबरपासून बाईक बुक करू शकणार आहे. सध्या ही बाईक भारतात फक्त दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई आणि हैदराबाद मध्ये उपलब्ध करण्यात आलीय. दरम्यान कंपनीने असेही जाहीर केले आहे की पहिल्या टप्प्यात ही बाईक आता भारताच्या ७० शहरांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

या पहिल्या टप्प्यात कंपनीचे लक्ष बेंगलोर, कोलकाता, सुरत आणि चंदीगड सारख्या आर्थिक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख शहरांवर असेल. तसेच कंपनीने रिलीज केलेल्या टीझर पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की कंपनीने हे रिव्हॉल्ट आरव्ही ४०० ही इलेक्ट्रिक बाईक अगदी नवीन डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह बनवली गेली आहे. तसेच कंपनीने जारी केलेल्या १४ सेकंदाच्या व्हिडीओ टीझरमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की ही इलेक्ट्रिक बाईक भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजेंसने सुसज्ज असणारी बाईक आहे.

रिव्हॉल्ट आरव्ही ४००चे संभाव्य फीचर्स

रिव्हॉल्ट मोटर्सने या बाईकच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीला या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ३ kW मिड ड्राइव्ह मोटर आणि ३.२४kWh क्षमतेचे लिथियम-आयन बॅटरी दिली जाऊ शकते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर या बाईकची रेंज १५० ते २०० किमी पर्यंत असणार आहे. या रेंजसह, तुम्हाला या बाईकमध्ये ८५ किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कंपनी या इलेक्ट्रिक बाईक मध्ये पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यासह, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, आणि माय रिव्हॉल्ट नावाचे अॅप देखील दिले जाणार आहे. मिळालेल्या अहवालानुसार माय रिव्हॉल्ट अॅपद्वारे तुम्हाला स्टार्ट-स्टॉप, शेवटचे पार्किंगचे स्थान, बॅटरीची स्थिती, जवळचे चार्जिंग स्टेशन आणि नेव्हिगेशन सारख्या सुविधा मिळणार आहे.