scorecardresearch

Brain Stroke Study: ६० वर्षाखालील व्यक्तींनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका; ‘या’ एका रक्तगटात आढळले सर्वाधिक रुग्ण

Brain Stroke By Blood Group: इस्केमिक स्ट्रोकमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो परिणामी जागीच मृत्यूचा धोकाही ओढवू शकतो.

Brain Stroke Study: ६० वर्षाखालील व्यक्तींनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका; ‘या’ एका रक्तगटात आढळले सर्वाधिक रुग्ण
Brain Stroke By Blood Group

Brain Stroke By Blood Group: जर्नल ऑफ न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अनुवांशिक आणि इस्केमिक स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये A रक्तगटाच्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. इस्केमिक स्ट्रोकमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो परिणामी जागीच मृत्यूचा धोकाही ओढवू शकतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे याचा धोका ६० वर्षाखालील व्यक्तींना अधिक असतो. या अभ्यासक्रमातून समोर आलेली सविस्तर माहिती जाणून घ्या.

किटनर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनुवांशिक आणि इस्केमिक स्ट्रोकवरील अभ्यासात ६ लाख निरोगी लोकांमधील १७ हजार रुग्णांचे निरीक्षण केले ज्यांना स्ट्रोकचा त्रास झाला होता. अभ्यासानुसार ए रक्तगट असलेल्या लोकांना लवकर स्ट्रोक होण्याची शक्यता असते. त्याच वेळी, O रक्तगट असलेल्या लोकांमध्ये याची शक्यता कमी असते असे आढळून आले.

Blood Sugar Level Per Age: तुमच्या वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती असायला हवे? पाहा ‘हा’ तक्ता

प्राप्त माहितीनुसार संशोधकांना असे आढळून आले की ए रक्तगट असणाऱ्यांना इतर रक्तगटांच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका १६ टक्के जास्त असतो. त्याच वेळी, O रक्तगट असलेल्या लोकांना इतर रक्तगटांच्या तुलनेत लवकर स्ट्रोक येण्याचा धोका १२ टक्के कमी आहे. तरीही या रक्तगटाच्या व्यक्तींनी सुदृढ असल्यास विशेष तपासणी करण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही मात्र तुम्हाला सतत आजारपण येत असल्यास नियमित चाचण्या करणे टाळू नये असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

स्ट्रोक येणे म्हणजे नेमकं काय?

मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा खंडित झाल्यास स्ट्रोक होतो. हे एकतर रक्तवाहिनी फुटल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा मेंदूला पुरवणाऱ्या बारीक रक्तवाहिन्यांमध्ये लहान गाठ झाल्यास असे होऊ शकते. मेंदूच्या कोणत्या भागावर परिणाम झाला आहे आणि रुग्णाला किती लवकर वैद्यकीय सेवा मिळते यासारख्या अनेक घटकांवर स्ट्रोकमुळे होणारे नुकसान अवलंबून असते.

रक्तगट व इतर रोग

रक्तगट आणि रोगाचा धोका यांच्यातील दुवा इतर अनेक आजारांमध्येही दिसून येतो. पूर्वीच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रक्तगट O च्या तुलनेत, रक्तगट ए आणि बी असलेल्या लोकांमध्ये डीप व्हेन थ्रोम्बोसिस होण्याचा धोका जास्त असतो – अशी स्थिती ज्यामध्ये पायांच्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. या गाठींमुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. PLOS One 2017 मध्ये प्रकाशित अभ्यासात देखील कर्करोगाबाबत दावा केला होता. “रक्त प्रकार ए च्या तुलनेत, रक्त प्रकार बी ला सर्व प्रकारच्या कर्करोगांचा धोका अधिक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Risk of brain stroke in people under 60 the highest number of patients were found in similar blood group svs

ताज्या बातम्या