Rujuta Diwekar funny advice on wine | Loksatta

वाईन ही हृदयासाठी.. आहार तज्ज्ञ रुजुता यांचा मजेदार सल्ला, वाचून पोट धरून हसाल

आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी अलिकडे एक मजेदार सल्ला दिला आहे. हा सल्ला वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि वाचून झाल्यावर हसू देखील येईल.

वाईन ही हृदयासाठी.. आहार तज्ज्ञ रुजुता यांचा मजेदार सल्ला, वाचून पोट धरून हसाल
रुजुता दिवेकर (source – rujuta diwekar/instagram)

आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर या नेहमी आपल्या इन्स्टाग्रामवर पोषक आहारासंबंधी पोस्ट करत असतात. वजन कमी करण्यासाठी कोणते आहार घ्यावे, कोणता व्यायाम करावा, चालण्याचे फायदे इत्यादी लोकोपयोगी सल्ले त्या देतात. मात्र अलिकडे त्यांनी एक मजेदार सल्ला दिला आहे. हा सल्ला वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि वाचून झाल्यावर हसू देखील येईल.

जागतिक हृदय दिवसाच्या पार्श्वभूमीवर रुजुता यांनी ही पोस्ट केली. यामध्ये त्यांनी वाईन ही शरीरासाठी चांगली असल्याचे म्हटले. पण त्यांनी पुढे जे लिहिले ते पाहून तुम्हाला चांगलाच हशा पिकेल. त्या म्हणाल्या वाईन ही हृदयासाठी चांगली आहे. केवळ इतके करा की, तिला जिमला न्या आणि घरी परत आणा पण तिचा घोट घेऊ नका. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून ३ वेळा असे करा, असा मजेदार सल्ला रुजुता यांनी दिला.

सुरुवातीची ओळ वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असावा, मात्र नंतरच्या ओळी वाचून त्यांनी फार योग्य सल्ला दिल्याचे तुम्हाला वाटेल. रुजुताच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने हा खूपच छान सल्ला असल्याचे म्हटले, तर एका यूजरने त्यांच्या विषयी अभिमान वाटत असल्याचे म्हटले . तर एका यूजरने आम्ही वाईनशिवायही जीमला जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिली. तर एका यूजरने मी पहिल्यांदा तुमच्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
World Heart Day 2022 : ३०-३५ वर्षे वयोगटातील तरुणांनाही हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या कारणे

संबंधित बातम्या

‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
Uric Acid: शरीरातील युरिक ऍसिड वाढवतात ‘ही’ ३ फळे; बोटांना सूज, थकव्यासह दिसून येतात ‘ही’ लक्षणे
युरिक ऍसिडच्या त्रासात लिंबासह ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते रामबाण उपाय; हृदय व किडनी आजारांपासून राहा लांब
सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय, तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या त्यामागचं कारण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…
राज ठाकरेंनी पुन्हा बोलून दाखवली मतं मिळत नसल्याची खंत? निवेदन घेऊन आलेल्यांना म्हणाले, “आम्ही फक्त…”
ही ‘राज’नीती मुंबईत कशी जिंकणार?
“जर मी आक्रमक झालो तर त्याला..”, IND vs NZ आधी अर्शदीप सिंगचं उमरान मलिकबाबत मोठं विधान
“काश्मीर फाईल्स व्हल्गर आणि प्रचारकी”, ज्युरींच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रया, म्हणाले “चित्रपटात एका पक्षाचा…”