शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करणे खूप महत्वाचे असते. शरीरावरील घाण, घामामुळे जमा होणारे बॅक्टेरिया काढण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी अंघोळ करणे फार महत्वाचे असते. अंघोळीमुळे शरारीतील ऊर्जेची पातळी आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. पण, आपण अंघोळीला जातो, साबणाने थोडं अंग घासल्यासारखं करतो, पाणी ओततो आणि टॉवेलने अंग पुसून बाहेर येतो, अवघ्या तीन ते पाच मिनिटांत अंघोळ होते.

यामुळे शरीरावरील घाण नीट साफ होत नाही किंवा इतर कोणतेही फायदे मिळत नाहीत. शरीरावर साचलेली घाण जर नीट साफ झाली नाही तर ती अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे अंघोळीची योग्य पद्धत जाणून घेणे खूप गरजेचे आहे. दुसरे म्हणजे अंघोळ केल्यावर शरीरच नाही तर मनही फ्रेश होते. जसे आयुर्वेदात जेवणाचे, सकाळी उठण्याचे आणि योगासने करण्याचे नियम आहेत, त्याचप्रमाणे अंघोळीचेही काही नियम आहेत, ज्याचे पालन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊ हे नियम.

१) अंघोळ करण्याची योग्य वेळ

आयुर्वेदानुसार, सूर्योदयापूर्वी उठणे, शौचास जाणे आणि दात घासल्यानंतर लगेच अंघोळ करावी. पण, काही जण घाईगडबडीत किंवा आळशीपणा करत अंघोळ करतात. तर काही लोक दिवसभर अंघोळही करत नाहीत. यात सूर्यास्ताच्या वेळी शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ केली पाहिजे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटून रात्री शांत झोप येण्यास मदत होते.

२) पाण्याचे योग्य तापमान आणि प्रमाण

आयुर्वेदानुसार, अंघोळीसाठी थंड किंवा कोमट पाणी वापरणे फायदेशीर आहे. काहींना खूप गरम पाण्यानेही अंघोळ करणे आवडते. परंतु, ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशाने शरीरात कोरडेपणा वाढतो. गरम पाणी केसांसाठीही आणखी हानिकारक आहे. त्यामुळे केस खडबडीत होऊन जास्त प्रमाणात तुटणे सुरू होते.

आयुर्वेदानुसार, व्यक्तीने हत्तीसारखी अंघोळ केली पाहिजे. याचा अर्थ असा की, आपण स्वत:ला स्वच्छ करण्यासाठी पुरेश्या पाण्याचा वापर केला पाहिजे.

३) अंघोळीपूर्वी तेलाने मालिश करा

आयुर्वेदात अंघोळीपूर्वी शरीराला तेलाने मालिश करणे अनेक प्रकारे फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि स्नायूंचे क्रॅम्पही दूर होतात. त्यामुळे अंघोळ करण्यापूर्वी मोहरी, नारळ, तीळ किंवा बदामाच्या तेलाने शरीराला वरपासून खालपर्यंत मसाज करा. साधारण अर्धा तास असेच ठेवा आणि नंतर अंघोळ करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४) शरीर स्वतःच कोरडे होऊ द्या

अंघोळीनंतर अंगाला टॉवेलने घासून कोरडे करणे अजिबात योग्य नाही, अंघोळीनंतर शरीर दोन मिनिटे असेच राहू द्या. पाणी आपोआप सुकते. टॉवेलने घासल्यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि काही वेळा टॉवेल वेळोवेळी न धुतल्याने त्वचेचे नुकसान होते.