Tips to Keep Fungus Away During the Monsoon : पाऊस आल्यानंतर हवामानात गारवा येतो, पण त्याचबरोबर घरात बुरशी वाढण्याचा धोकाही वाढतो. हवेत जास्त आर्द्रता (ओलावा) निर्माण होते आणि त्यामुळे भिंती, खिडक्या अशा ठिकाणी बाष्प साचतं. हीच परिस्थिती बुरशीसाठी योग्य ठरते. बुरशीची बीजं (spores) सतत आपल्या आजूबाजूला असतात, आणि त्यांना वाढण्यासाठी फक्त ओलसर, उबदार जागा लागते.

आरोग्यावर होणारे परिणाम काय असू शकतात?

बुरशीच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, विशेषतः ज्यांना अ‍ॅलर्जी, दमा किंवा कमकुवत रोगप्रतिकारशक्ती आहे.
सामान्य त्रास: शिंका येणे, सतत खोकला, डोळ्यांची खवखव / पाणी येणे, त्वचेवर पुरळ, खाज,
गंभीर परिणाम: दमा वाढणे किंवा दम्याचा अटॅक येणे, दीर्घकालीन श्वसन समस्या, बुरशी संसर्ग

 Safe Home: 7 Simple Tips to Keep Fungus Away During the Monsoon
पावसाळ्यात घरात बुरशी टाळण्यासाठी ७ सोपे आणि प्रभावी उपाय ( सौजन्य – फ्रिपीक)

पावसाळ्यात घरात बुरशी होऊ नये यासाठी हे उपाय करा: ( Simple Tips to Keep Fungus Away During the Monsoon)

घरात हवा खेळती ठेवा ((Ventilate your home well):

घरात सतत हवा खेळती राहणं अत्यंत गरजेचं आहे. खिडक्या उघड्या ठेवा, पंखे वापरा. यामुळे घरातला ओलावा कमी होतो. अंघोळीच्या वेळी बाथरूममध्ये पंखा चालू ठेवा. त्यामुळे गरम वाफ तिथेच साचणार नाही आणि बुरशी वाढण्याचा धोका टळेल.

दररोज स्वच्छता करा (Clean regularly and wipe surfaces) :

घरातील ओलसर भाग, जसं की बाथरूम आणि स्वयंपाकघर हे ॲण्टी-फंगल क्लीनरने नियमितपणे पुसा. जिथे पाणी साचतं, गळती होते, तिथे लगेचच पुसून सुकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

भेगा आणि फटी बंद करा (Seal cracks and gaps in wall):

खिडक्या, दरवाज्यांभोवतीच्या भेगा, कपाटाच्या बाजू, अशा जागी वॉटरप्रूफिंग सिलांट्सने बंद करा.पावसाचं पाणी आत शिरण्यापूर्वीच अडवलं गेलं, तर घर कोरडं राहील आणि बुरशीपासून सुरक्षित राहील.

डिह्युमिडिफायरचा वापर करा (Use a dehumidifier in damp areas) :

बाथरूम, बेसमेंट, स्टोअर रूम अशा ओलसर जागांमध्ये dehumidifier ठेवल्यास हवेतला ओलावा कमी होतो. बेसमेंटमध्ये याचा उपयोग केल्यास बुरशी वाढण्याचा धोका लक्षणीय कमी होतो.

 Tips to Keep Fungus Away During the Monsoon
पावसाळ्यात बुरशीपासून घर वाचवायचंय? ही ट्रिक्स खूप उपयोगी ठरतील ( सौजन्य – फ्रिपीक)

ओले कपडे व्यवस्थित वाळवा (Dry wet items completely before storing)

टॉवेल्स, चटई, गाद्या किंवा भिजलेले कपडे पूर्ण सुकल्याशिवाय ठेवू नका.ओलसर कापड हे बुरशीसाठी अन्नासारखं असतं.

बुरशी-प्रतिरोधक फॅब्रिक्स वापरा (Choose Mold-Resistant Fabrics):

पावसाळ्यात परदा, कुशन कव्हर्ससाठी सिंथेटिक किंवा मोइश्चर-विकिंग फॅब्रिक्स वापरा. या कपड्यांमध्ये ओलावा साठत नाही आणि बुरशीचा धोका कमी होतो.

दर आठवड्याला निरीक्षण करा (Inspect for signs of mold and act quickly)

भिंती, छप्पर, कोपरे याठिकाणी कुठे डाग, वास, किंवा काळपट बुरशी दिसते का हे तपासा. असले काही लक्षणं दिसल्यास तत्काळ सफाई करा आणि ओलावा कुठून येतोय ते शोधा.