सॅमसंग कंपनीने गेल्या महिन्यातच आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A70 लाँच केला होता. या स्मार्टफोनसाठी आगाऊ नोंदणी आधीपासूनच सुरू होती आता आजपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवरुन आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा स्मार्टफोन खरेदी केल्यास दोन हजार रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. आजपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असला तरी काही दिवसांमध्ये हा स्मार्टफोन सॅमसंग ऑनलाइन शॉप, सॅमसंग ओपरा हाउस आणि रिटेल स्टोअर्समधूनही खरेदी करता येईल. २८ हजार ९९० रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे.

६जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज (मेमरी कार्डद्वारे 512जीबीपर्यंत वाढवणं शक्य) असलेल्या Samsung Galaxy A70 या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच फिचरसह ६.७ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. या फोनचे वैशिट्य म्हणजे या फोनची बॅटरी अगदी कमी कालावधीत चार्ज होणार आहे(सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट). या फोनला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचा सेल्फी कॅमेरा तब्बल ३२ मेगापिक्सेलचा आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता ४,५०० mAh देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड पाय ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्ल्यू आणि व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनला 3D ग्लास्टिक डिझाईन देण्यात आले आहे. तसेच वॉल्यूम आणि पॉवर बटण स्मार्टफोनच्या डाव्याबाजूस देण्यात आले आहे.

काय आहेत फोनचे फिचर्स:
-वॉटरड्रॉप नॉच
-६.७ इंच डिस्प्ले
-३२ मेगापिक्सेल + ८ मेगापिक्सेल + ५ मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा
-३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
-४,५०० mAh बॅटरी
-अॅन्ड्रॉइड पाई व्हर्जन
-इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
-ऑक्टा-कोर प्रोसेसर
-६ जीबी आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज (मेमरी कार्डद्वारे 512जीबीपर्यंत वाढवणं शक्य)
-सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट