भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंग कंपनी आपला आणखी एक बजेट फोन बाजारात घेऊन येतोय. सॅमसंगचा प्लॅगशिप गॅलक्सी नोट ९ भारतामध्ये २२ ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. पॉवरफूल बॅटरी, १ टीबीपर्यंतची मेमरी आणि एस पेनमधील आकर्षक फिचर्स हे फोनचे वैशिष्ट्य आहे. ९ ऑगस्ट रोजी अमेरिकामधील एका कार्यक्रमादरम्यान Samsung Galaxy Note 9 लॉन्च करण्यात आला होता. आता भारतामध्ये २२ तारखेला हा फोन दाखल करण्याचा मुहुर्त सॅमसंगने निवडला आहे. मध्यंतरी सॅमसंगने गॅलेक्सी ऑन ८ हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला होता. Samsung Galaxy Note 9 हा फोन सॅमसंग गॅलक्सी ऑनचे अपग्रेडेड व्हेरियंट आहे. पहिल्यापेक्षा आधिक चांगला असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे.

सध्या Samsung Galaxy Note 9 ची प्री बुकिंग सुरु आहे. ग्राहक ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने फोन बुक करू शकतात. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सैमसंग मोबाइल स्टोरवर जाऊन ऑनलाईन बुकिंग करू शकता. Samsung Galaxy Note 9 हा फोन दिसायला सध्याच्या गॅलेक्सी नोट ८ सारखाच आहे. मात्र, फोनच्या डिझाईनमध्ये थोडे बदल केल्याने फोन सहज हातात पकडता येतो. गॅलेक्सी नोट ९ हा फोन ६ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरी आणि ८ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध असेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये मायक्रो एसडी कार्डची सुविधा असून एक्स्पांडेबल मेमरी ५१२ जीबीपर्यंतची असेल. ६ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ६७ हजार रुपये तर ८ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ८४ हजार ९०० रुपये  इतकी असेल.

 फोनचे फिचर्स काय?

  • फोनची स्क्रीन – ६.४ इंच
  • फोनचा डिस्प्ले – क्वाड एचडी + सुपर एमोलेड इन्फिनीटी डिस्प्ले २.०, रिझॉल्यूशन १४४०x२९६० पिक्सल (सॅमसंगच्या गॅलेक्सी नोट सीरिजमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या डिस्प्लेचा वापर)
  • वजन – २०० ग्रॅम
  • प्रोसेसर – अमेरिकेत गॅलेक्सी नोट ९ हा फोन स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरमध्ये (२.८ Ghz + १.७ Ghz) उपलब्ध असेल. तर भारतात हा फोन एक्सिनॉस ९८१० प्रोसेसरमध्ये (२.८ Ghz + १.७ Ghz) उपलब्ध असेल.
  • एस पेन- गॅलेक्सी नोट ९ मधील एस पेनमध्ये ब्लूटूथ असेल. एस पेनचा वापर रिमॉट कंट्रोल म्हणूनही करता येईल. एस पेनद्वारे तुम्ही फोटो देखील काढू शकाल. ४० सेकंद चार्ज केल्यास एस पेनचा वापर तब्बल अर्धा तासासाठी करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
  • बॅटरीची क्षमता – ४००० एमएएच
  • कॅमेरा – मोबाईल फोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप आहे. दोन्ही लेन्स या १२ मेगापिक्सलच्या आहेत. तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.
  • भारतात हा फोन ड्यूअल सिम व्हेरिएंटमध्येही उपलब्ध असणार आहे.
  •  गेम खेळताना फोन थंड राहावा, यासाठी फोनमध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापरही करण्यात आला आहे