Raw papaya benefits in marathi: पपई खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पपई आरोग्यासाठी फायदेशीर गुणांचा खजिना असल्याचे मानले जाते. त्यात अनेक पोषक घटक आढळतात. पपईच्या सेवनाने पोटासंबंधी समस्या जसे की, ब्लोटिंग, बद्धकोष्ठता, सूज इत्यादी समस्या दूर होतात. पचनक्रिया चांगली होण्यासाठी पपई खाल्ली जाते. जास्तीत जास्त लोक पिकलेली पपई खातात; पण आज आम्ही तुम्हाला कच्ची पपई खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

कच्ची पपई खाण्याची ५ कारणे

१. थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्मांनी परिपूर्ण : कच्च्या पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. USDA च्या आकडेवारीनुसार, त्यात जवळजवळ ८८ टक्के पाणी असते, जे तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्यात सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारा प्रभावदेखील असतो, जो विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो आणि शरीराला नैसर्गिकरीत्या थंड करतो.

२. पचनासाठी उत्तम : पपईमध्ये पपेन असते, एक शक्तिशाली एंझाइम जो प्रथिने तोडतो आणि पचनास मदत करतो. न्यूरो एंडोक्रायनोलॉजी लेटर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पपेन केवळ पचन सुधारत नाही, तर पोटफुगी आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS)ची लक्षणेदेखील कमी करते. उन्हाळ्यात आपले चयापचय मंदावते, त्यावेळी कच्ची पपई मदत करू शकते.

३. रोगप्रतिकार शक्ती वाढवते: व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन एने भरलेली कच्ची पपई रोगप्रतिकार शक्तीला समर्थन देते आणि उन्हाळ्यातील सामान्य संसर्गांपासून संरक्षण करते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) नुसार, १०० ग्रॅम कच्ची पपई तुमच्या दैनंदिन व्हिटॅमिन सीच्या गरजेच्या ६० टक्क्यांहून अधिक पौष्टिकता देते, जे हंगामी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.

४. वजन नियंत्रित करण्यास मदत करते : कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असलेली कच्ची पपई तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स (GI)देखील कमी आहे म्हणजेच ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. अनेक अभ्यासांनी कच्च्या पपईचा संबंध कमी झालेल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीशी जोडला आहे.

५. त्वचेला पोषण देते : पोषणतज्ज्ञ आणि मॅक्रोबायोटिक प्रशिक्षक शिल्पा अरोरा स्पष्ट करतात, “कच्च्या फळातील फायबर शरीरातील कोणत्याही विषारी पदार्थांपासून शरीर स्वच्छ करते. त्यामुळे दररोज कच्ची पपई खाल्ल्याने मुरमे, डाग यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.” त्यामुळे मृत त्वचेच्या पेशी विरघळण्यास आणि जुन्या पेशी दुरुस्त करण्यासही मदत होऊ शकते. त्यामुळे त्वचेला आतून पुन्हा जिवंत होण्यास साह्य मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्भवती महिलांना पपई टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण- ते गर्भाशयाच्या आकुंचनास उत्तेजन देऊ शकते. म्हणून गर्भधारणेदरम्यान तुमच्या आहारात ते समाविष्ट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले.