scorecardresearch

आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावा? जाणून घ्या कारण

आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवण्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत.

mango soak in water
(फोटो: Pixabay)

आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते आणि उन्हाळ्यात या रसदार आणि स्वादिष्ट फळ खाण्याची एक वेगळीच मजा असते. आंब्याचा सीजन येताच, लोकांना आपापल्या पद्धतीने आंबा खायला आवडतो. पण वर्षानुवर्षे आपले घरातले वृद्ध आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवायला सांगताना दिसून आले आहे. आंबे किमान २ तास आधी पाण्यात बुडवावेत असा सल्ला दिला जातो. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत जी तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आयुर्वेदात काय सांगितले आहे?

सर्व फळे आणि भाज्यांमध्ये काही प्रकारचे थर्मोजेनिक गुणधर्म असतात जे शरीराच्या कार्यावर परिणाम करतात. आंबे पाण्यात भिजवल्याने त्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते. पाण्यात भिजवलेली फळे खाल्ल्याने बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी आणि जुलाब या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात.

(हे ही वाचा: विश्लेषण: आईस्क्रीममुळे शरीराला खरंच थंडावा मिळतो का? जाणून घ्या)

पाण्यात भिजवणे का आहे गरजेचे?

आंबा पाण्यात भिजवण्याची पद्धत फार जुनी आहे. असे केल्याने अतिरिक्त फायटिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते. म्हणूनच पाण्यात भिजवलेला आंबा खाल्ल्यास शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टरबूज, आंबा आणि पपई यांसारखी फळे शरीरात उष्णता निर्माण करतात आणि जास्त उष्णतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे डायरिया आणि स्किन इन्फेक्शनची समस्या होऊ शकते. अशावेळी फळे पाण्यात भिजवल्याने नैसर्गिक उष्णता कमी होते आणि शरीरासाठी सुरक्षित असू शकते.

(हे ही वाचा: कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? चुकीच्या वेळेचा किडनीवर होऊ शकतो परिणाम)

आंबा पाण्यात भिजवण्याचे वैज्ञानिक कारण

आंब्याच्या त्वचेवरील घाण, कीटकनाशके आणि नको असलेली रसायने काढून टाकण्यासाठी पाण्यात भिजवणे आवश्यक आहे. हे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात. आंबा सामान्यतः शरीराचे तापमान वाढवतो, ज्यामुळे थर्मोजेनेसिस होतो. त्यामुळे अर्धा तास पाण्यात भिजवल्यास त्याचे थर्मोजेनिक गुणधर्म कमी होतात.

(हे ही वाचा: Photos: ‘ही’ पाच देसी पेय तुम्हाला उन्हाळ्यात करतील रिफ्रेश!)

नक्की आंब किती वेळ भिजवायचा?

आंबा १५-30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. आंब्यामध्ये भरपूर उष्णता असते आणि भिजवण्याची प्रक्रिया त्यांना अधिक तापमान तटस्थ बनवते. पाण्यात भिजवल्याने आंब्याची उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. भिजल्यावर, आंबे पाण्यातून काढून टाका आणि थंड होऊ द्या आणि मगच खा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Science behind soaking mangoes before eating ttg

ताज्या बातम्या