गोड खाण्याची आवड असणाऱ्या मात्र, दात किडीमुळे त्रस्त असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण शास्त्रज्ञांनीच आता दात किडू न देणारी कँडी तयार कऱ्यात य़श मिळवले आहे.
संशोधकांनी दातांवर पोकळी-निर्णाण करणाऱ्या जिवाणूंचा खात्मा करणाऱयासाठी एक नवीन ‘साखर मुक्त’ कँडी विकसित केली आहे.
बर्लिन बायोटेकच्या ख्रिस्टीन लँग यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या संशोधनावर काम केले आहे. प्रयोगासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तींना कँडी खाण्यासाठी देण्यात आल्या. त्यातून करण्यात आलेल्या नोंदींवरून शास्त्रज्ञ या निष्कर्षा पर्यंत पोहचले आहेत. या कँडीमुळे अपायकारक जिवाणूंवर आळा आला असल्याचे शास्त्रज्ञांनी ‘मेडीकल एक्स्प्रेस’मध्ये नमूद केले आहे.
काही खाल्ल्यावर दातांच्या पृष्ठभागावर जमा होणाऱ्या अन्नकणांमध्ये जिवाणू तयार होतात. या जिवाणूंमुळे एका ठरावीक आम्लाची निर्मिती होऊन दातांना क्षती पोहचते. कँडीचा प्रयोग केलेल्या एक तृतीयांश जणांच्या दातांमधील जिवाणूचे प्रमाण मोठ्या स्तरावर कमी झाले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2013 रोजी प्रकाशित
आता कँडीच करणार दातांचे रक्षण!
गोड खाण्याची आवड असणाऱ्या मात्र, दात किडीमुळे त्रस्त असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण शास्त्रज्ञांनीच आता दात

First published on: 11-12-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientists create candy that prevents tooth decay