Navratri 2025: हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. २२ सप्टेंबर रोजी सुरू झालेली शारदीय नवरात्री २ ऑक्टोबर रोजी दशमी तिथीला संपणार आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची विधिपूर्वक पूजा केली जाते आणि कन्या पूजन हा देखील एक विधी आहे. तरूण मुली स्वत: देवी गुर्गेचेच रूप आहेत. म्हणूनच नवरात्रीत मुलींना आमंत्रित करणे, त्यांची पूजा करणे आणि त्यांना जेवू घालण्याची प्रथा आहे. काही लोक पहिल्या दिवसापासून दररोज मुलींची पूजा करतात, तर बरेच जण महाअष्टमी आणि नवमीला कन्या पूजन आयोजित करतात.

या वर्षी नवरात्र नेहमीप्रमाणे नऊ दिवस नसून दहा दिवस आहे. त्यामुळे महाअष्टमी आणि नवमीच्या तारखांबाबत काहीसा संभ्रम आहे. म्हणूनच कन्या पूजन करण्यासाठी कोणता दिवस शुभ आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

शारदीय नवरात्रीत १ ते १० वर्षे वयोगटातील मुलींची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे. प्रत्येक वयोगटातील मुलींची पूजा केल्याने वेगवेगळे फायदे आणि आशीर्वाद मिळतात.

शारदीय नवरात्रीची महाअष्टमी आणि नवमी तिथी कधी असते?

हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होते आणि ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी संपते. त्यानंतर नवमी तिथी येईल, जी १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून १ मिनिटांनी सुरू होईल.

महाअष्टमी २०२५ – ३० सप्टेंबर
महानवमी कधी आहे – १ ऑक्टोबर

कन्या पूजन कधी करावे?

शारदीय नवरात्रात महाअष्टमी आणि महानवमीला मुलींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या काळात मुलींची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते.

अष्टमीला कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त

सकाळी ५ वाजून १ मिनिटांनी ते ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत
दुसरा मुहूर्त- सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी ते १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत
अभिजित मुहूर्त- सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी ते दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत

महानवमीला कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त

ब्रम्ह मुहूर्त सकाळी ४ वाजून ३७ मिनिटांनी ते ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत
सकाळी ५ वाजून १ मिनिटांनी ते ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत
रवि योग २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी ते ६वाजून १५ मिनिटांनी

कन्या पूजनाचे साहित्य

मुलींचे पाय धुण्यासाठी एक स्वच्छ प्लेच, पाणी आणि पुसण्यासाठी कापड
महावर किंवा अलता
कुंकू
तांदूळ
बसण्यासाठी आसन
पूजेचं ताट
तुपाचा दिवा
फुलं, गजरा
लाल चुनरी
जेवण – खारी पुरी आणि चण्याची भाजी
भेटवस्तू

कन्या पूजन मंत्र

कन्या स्वरूपात देवी सर्वभतेषु
नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम:
ओम श्री दुन दुर्गायै नम:
ओम श्री कुमाराय नम:
ओम श्री त्रिगुणात्मिकाय नम: