Blood Group and Nature: आपण जसे बोलतो, वागतो, जगतो… त्यामागे काहीतरी गुपित दडलंय, असं तुम्हाला वाटतं का? शास्त्र सांगतं की, व्यक्तिमत्त्व घडवण्यात अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. पण, एखाद्या साध्या गोष्टीत तुमचं खरं स्वरूप दडलं असेल तर? आश्चर्य वाटेल; पण तुमच्या शरीरात फिरणाऱ्या एका गोष्टीत तुमचं नेमकं व्यक्तिमत्त्व लपलेलं असतं.
प्रत्येक माणूस वेगळा असतो… त्याचं वागणं, बोलणं, विचार करण्याची पद्धत हे सगळं त्याला इतरांपासून वेगळं ठरवतं. आपण समोरच्या व्यक्तीला त्याची वागणूक, सवय किंवा स्वभाव यांवरून ओळखतो. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या रक्तगटावरून (Blood Group) देखील तुमचं व्यक्तिमत्त्व ओळखता येतं, असं म्हटलं जातं. विज्ञानानं हे ठामपणे मान्य केलेलं नसलं तरी अनेक लोक याला मनोरंजन म्हणून स्वतःला जाणून घेण्यासाठी खूप महत्त्व देतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणता रक्तगट कसा स्वभाव सांगतो…
रक्तगट आणि स्वभावाचा जबरदस्त संबंध! जाणून घ्या तुमचा ग्रुप काय सांगतो तुमच्याबद्दल..
रक्तगट A
हा रक्तगट असलेले लोक शांत, प्रामाणिक व संयमी असतात. कठीण प्रसंगातही हे सहजपणे संतुलन राखतात. प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता (Perfection) शोधतात. जबाबदार स्वभावाचे, संवेदनशील मनाचे असतात. मात्र, कधी कधी अति विचार करण्यामुळे हे लोक स्वतःलाच ताण देऊन बसतात.
रक्तगट B
स्वतंत्र, मोकळेढाकळे व क्रिएटिव्ह विचार करणारे लोक म्हणजे रक्तगट B असलेल्या व्यक्ती. हे लोक उत्साही, मजेशीर व सामाजिक असतात. जीवन मस्तीत जगण्यावर यांचा विश्वास असतो. लोकांना प्रेरित करणे, आनंद देणे यांत ते पुढे असतात. पण, काही वेळा हेच लोक थोडे स्वार्थी किंवा असंवेदनशीलही होऊ शकतात.
रक्तगट AB
हा गट म्हणजे A व B या दोन्ही गटांचा संगम. अशा लोकांचा स्वभाव मिश्रित असतो. बुद्धिमान, समजूतदार व बहुगुणी असतात. हे लोक शांतपणे परिस्थिती हाताळतात. मात्र, कधी कधी ते स्वतःच्या गुंतागुंतीच्या विचारांमुळे गोंधळून जातात.
रक्तगट O
या गटाच्या लोकांकडे जन्मजात नेतृत्वगुण असतात. आत्मविश्वास, धाडस व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ही त्यांची खरी ताकद असते. हे लोक सामाजिक, आकर्षक व पॉझिटिव्ह विचार करणारे असतात. अशा व्यक्तींमुळे इतरांना प्रेरणा मिळते. पण, कधी कधी आत्मविश्वासाच्या अतिरेकामुळे त्यांच्यात अहंकार वाढू शकतो.
तर सांगू शकता का, तुमचा Blood Group तुमचं खरं व्यक्तिमत्त्व उघड करतंय का? कदाचित तुमच्या स्वभावाबद्दलची अनेक उत्तरं येथेच दडलेली असतील…
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)