बदामामध्ये आरोग्यास पोषकघटकांचा समावेश असल्यानं डॉक्टर आपल्याला त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. यात प्रथिने, फायबर, चरबी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि बरंच काही असतं. हे वजन कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सुद्धा बदाम उपयुक्त असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदाम कसे खावेत त्यासोबतच एका दिवसामध्ये किती बदाम खावेत याचा ही विचार करणे गरजेचं आहे. बदामांचे सेवन नियमित केल्याने हृदय, मेंदू, त्वचा आणि केसांशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर बदामाचे सेवन मधुमेह, खोकला, अनिमिया, श्वसनरोगामध्येदेखील फायद्याचे आहे. बदामाच्या सेवनाने पचनशक्ती आणि शरीराच्या मेटाबोलिक रेटमध्ये सुधार होतो. तसंच वजन घटविण्यासाठी देखील बदामाचे सेवन फायदेशीर आहे. पण बहुतेक व्यक्तींना एका दिवसामध्ये किती बदाम खाल्ले जावेत ह्याची कल्पना नसते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should we eat 22 23 almonds in a day read here to find out prp
First published on: 26-09-2021 at 20:32 IST