How To Identify Good Mushrooms: मशरूम खाण्यास केवळ चविष्टच नाहीत, तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. यामध्ये प्रथिने, खनिज, क्षार, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन डी यासह अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. मशरूमच्या २०००हून अधिक प्रजाती आहेत. मात्र यापैकी केवळ २५ प्रकारचे मशरूम खाण्यायोग्य असतात. काही मशरूम खूप विषारी असतात, ते खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. म्हणून ते खरेदी करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी ते व्यवस्थित ओळखून घेणे गरजेचे आहे. मशरूम ओळखण्याचे काही सोपे मार्ग आहेत ते जाणून घ्या…
रंग पाहून ओळखा
जर मशरूम लाल, पिवळा, नारिंगी किंवा चमकदार रंगाचा असेल तर तो विषारी असू शकतो. असे मशरूम खरेदी करणे आणि खाणे टाळा. ते धोकादायक ठरू शकतात. टोकदार टोक असलेले मशरूम देखील विषारी असतात.
तीव्र वास
विषारी मशरूमला खूप तीव्र आणि घाणेरडा असा वास येतो, त्यामुळे ते विषारी असल्याचे कळते. त्यांना तीव्र रसायनासारखा वास असू शकतो. ते खाण्यास सुरक्षित नाहीत.
खरेदी करण्यापूर्वी आकार पहा
मशरूम खरेदी करण्यापूर्वी त्याचा आकार नेहमी चेक करा. विषारी मशरूम कंदयुक्त असतात, त्यांची टोपी थोड्या वेगळ्या आकाराची असते. टोपीभोवती एक रिंगसारखी रचना असू शकते. छत्रीसारखे दिसणारे मशरूम खाऊ नयेत.
जर तुम्हाला मशरूमवर पांढरे गिल किंवा पांढरे बीजाणूंचे ठसे दिसले तर ते विषारी अशू शकते. यासाठी मशरूम उलटे करून पहा. खाण्यायोग्य मशरूममध्ये गडद बीजाणू नसतात. विषारी मशरूमच्या देठावर पांढरे वर्तुळ असतात आणि त्यावर अधिक ठिपके असतात.
