how to preserve curry leaves : कढीपत्त्याच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त असतात. याच्या वापराने केस आणि त्वचेच्या पोषणासोबत शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत करणारे अनेक घटक असतात. यासह एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठीही कढीपत्ता वापरला जातो. अगदी, डाळ, पोहे, उपम्यासह अनेक भाजांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरला जातो.
काहीजण घराबाहेरील कुंडीत लावलेल्या कढीपत्याच्या रोपाची पानं काढून ती पदार्थांमध्ये वापरतात. पण बहुतेक जण बाजारातून किंवा शेजारच्यांकडून कढीपत्ता घेतात. पण कढीपत्ता रोज शेजाऱ्यांकडून लोकांकडून किंवा खरेदी करुन वापरणे शक्य होत नाही. अशावेळी आपण एकदाच कढीपत्ता आणून तो फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्येही ठेवूनही कढीपत्त्याची पानं लवकर काळी पडतात. अशावेळी कढीपत्ता खूप दिवस ताजातवाणा ठेवायचा कसा असा प्रश्न पडतो. यामुळे कढीपत्ता साठवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत.
कढीपत्ता दीर्घकाळ ताजातवाणा ठेवण्यासाठी फॉलो करा ‘ही’ सोप्पी पद्धत
१) कढीपत्ता जास्त दिवस साठवायचा असेल तर प्रथम तो नीट साफ करा, खराब झालेली किंवा किड लागलेली पानं काढून टाका. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
२) आता पानांमधील पाणी नीट निथळून घ्या, आणि पानं सुकण्यापासून प्लेटमध्ये पसरवा.
३) आता ही पानं व्यवस्थित सुकण्यासाठी १ ते २ दिवस सूर्यप्रकाशात ठेवू शकता. किंवा मायक्रोओव्हनमध्ये ३० सेकंद गरम करु शकता.
४) जर तुम्ही दोन्ही पर्याय सध्या उपलब्ध नसतील तर तुम्ही ही पानं पंख्याखाली सुकवून वर्तमानपत्रात गुंडाळून ठेऊ शकता. फक्त ही पानं इतकी चांगली सुकली पाहिजेत की हाताने चिरडल्यानंतरही सहजपणे तुटतील.
५) पानं व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्ही ती हवाबंद डब्यात किंवा पिशवीत सहज साठवून फ्रिजमध्ये ठेवू शकता. अस केल्यास पानांना बुरशी लागणार नाही. यासोबत ती खूप दिवस ताजी टवटवीत राहतात. अशाप्रकारे तुम्ही ५ – ६ महिने कढीपत्ता वापरु शकता.
६) तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही ते खोलीत थंड ठिकाणी ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवा की, आजूबाजूला पाणी किंवा ओलसरपणा नसेल.
कढीपत्त्याची पानं १५ – २० दिवस राहतील हिरवीगार
१) जर कढीपत्त्याची पानं सुकल्यानंतर वापरु इच्छित नसाल तर ती १ ते २ आठवड्यापर्यंत साठवण्यासाठी पेपर टॉव्हेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवू शकता.
२) याशिवाय कढीपत्त्याची सुकलेली पानं ताजी ठेवण्यासाठी तुम्ही डब्ब्यात लिंबू ठेवा. यामुळे कढीपत्त्याची पानं आठवडाभर हिरवीगार राहतात.