Skin Care Tips for summer : चेहऱ्यावर एक पिंपल दिसला तरी आपल्याला टेंशन येतं. उन्हाळ्याच्या हंगामात पिंपल्स, चिकटपणा आणि डाग सामान्य आहेत. अशा परिस्थितीत, लोक खूप अस्वस्थ होतात आणि त्यातून सुटका करण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. पण त्यांना आराम मिळत नाही, जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.आज आम्ही तुम्हाला या लेखातून असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत जो तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करून तुम्हाला अधिक चांगले सौंदर्य देऊ शकतो. सोबतच काही खास टिप्स सुद्धा जाणून घ्या ज्या तुम्हाला तुमच्या स्कीन केअर मध्ये उपयुक्त ठरतील.

मूगडाळ प्रत्येकाच्या घरी आढळते. आरोग्याच्या दृष्टीने मूगडाळ अत्यंत पौष्टिक आणि पचण्याजोगी आहे. पण तुम्हाला माहित आहे का की मूगडाळ तुमच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते. तुम्ही मूग डाळ वापरून स्क्रब बनवू शकता. यामुळे चेहऱ्यावरच्या समस्या कमी होतात. चला जाणून घेऊया स्क्रब कसा बनवायचा.

मुग डाळीचा वापर

प्रत्येकांच्या स्वयंपाकघरात मुग डाळीचा वापर केला जातो. लोक त्याचा वापर वरण, कोरड्या भाजी, खिचडी इत्यादी बनवण्यासाठी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मुग डाळीचा वापर चेहऱ्यासाठीही करता येतो? मूग डाळीचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि मुरुम कमी करण्यासाठी मदत करते.

मुग डाळीचा स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

. मुग डाळ

. मध

. दही

मुग डाळीचा स्क्रब कसा बनवायचा

१. तुम्ही मूग डाळीपासून स्क्रब बनवू शकता. यासाठी तुम्हाला मूग डाळ स्वच्छ धुवावी. नंतर रात्री पाण्यात भिजत ठेवावी.

२. नंतर सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर दोन चमचे मूग डाळीमध्ये एक चमचा दही आणि एक चमचा मध घाला.

३. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता.

४. असे आठवड्यातून १ ते २ वेळा करा. यामुळे चेहरा चमकदार दिसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार

टिप: काही लोकांना मूग डाळ वापरल्यास अॅलर्जी असू शकते. चेहऱ्यावर लाल रॅशेस, पिंपल्स किंवा ॲलर्जीसारखे काही दिसले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.