Kitchen Hacks Viral Video: साबणावर खिळा? हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. खरंतर साबण हा आपल्या आयुष्याचा दररोजचा भाग आहे. अंघोळ, कपडे धुणं, भांडी घासणं… दिवसात किमान दोन-तीन वेळा साबणाशी आपला संबंध येतोच. पण, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये साबणाचा एक वेगळाच उपयोग दाखवला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी डोकं खाजवलंय, कारण साबण वापरण्याआधी त्यावर खिळा का मारायचा? असं कधी पाहिलंय का? साबणाला खिळा मारताच झाला भन्नाट जुगाड.
तुम्ही कल्पनाही केली नसेल की, साधा साबण तुमच्या घरातला ‘जुगाडू हिरो’ ठरू शकतो. एका महिलेने आपल्या घरी वापरलेली ही पद्धत दाखवली आणि काही सेकंदांतच लाखो लोकांनी तो व्हिडीओ पाहिला. व्हिडीओमध्ये ती महिला साबणाच्या एका टोकात खिळा आरपार मारते. हे पाहून सुरुवातीला थोडं विचित्र वाटतं. पण, पुढचा प्रयोग पाहिल्यावर तुम्हालाही म्हणावसं वाटेल, “वा, काय भन्नाट कल्पना आहे!”
असं काय घडलं साबणाला खिळा मारताच? परिणाम पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
नेमकं साबणावर खिळा का मारायचा? सुरुवातीला ही पद्धत पाहून वाटतं की साबण खराब होईल किंवा त्याची वाट लागेल. पण, खरी गंमत आहे शेवटी. जेव्हा तुम्ही साबणावर खिळा मारता तेव्हा त्यात छोटंसं छिद्र होतं. त्या छिद्रात एक दोरा ओवून तो बांधून घेतला की साबणाला नवं आयुष्य मिळतं.
साधारणपणे आपण साबण वॉश बेसिनवर किंवा पृष्ठभागावर ठेवतो, त्यामुळे तो पटकन वितळतो, ओला होतो आणि वाया जातो. कधी कधी तो घसरून खाली पडतो. पण, खिळ्यानं छिद्र पाडून, त्यात दोरा टाकून साबणाला लटकवलं की साबण कधीच वाया जात नाही. महिनाभर तो टिकतो.
या छोट्याशा जुगाडाने लोक अक्षरशः थक्क झालेत, कारण साधा-सुधा साबण, जो रोज वाया जातो, तो आता हुशारीने वापरता येतो. सोशल मीडियावर या प्रयोगाला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
फक्त खिळा मारला आणि साबणाचं रूप पालटलं! हा व्हिडीओ पाहून विश्वास बसणार नाही
Crazy Tips Az या यूट्यूब चॅनेलवर या जुगाडाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)