जोडीदाराच्या मृत्यूमुळे हृद्यविकार आणि पक्षाघातासारख्या जीवघेण्या आजारांच्या धोक्यात वाढ होत असल्याचे संशोधन जामा(जेएएमए) इंटरनल मेडिसीनने जाहीर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जीवनात घडणाऱया अशा दुख:द घटनांमुळे मानसिक त्रासात वाढ होते. जोडीदाऱया दु:खद घटनेमुळे पहिल्या ३० दिवसांमध्ये मानसिक त्रासाची क्षमता अधिक असते आणि यामुळे हृद्यविकार आणि पक्षाघाताच्या धोक्यात वाढ होते. ब्रिटनमधील सेंट जॉर्ज विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, हृद्यविकार आणि पक्षाघाताच्या धोक्याचे प्रमाणात जोडीदाराच्या मृत्यूनंतर वाढ झाल्याचे आढळून आले आहे. पन्नास रुग्णांच्या अभ्यासातून ज्यांच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यामुळे हृद्यविकाराच्या धोक्यात इतर रुग्णांपेक्षा वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
जोडीदाराच्या मृत्यूमुळे होणारा मानसिक त्रास आणि वैचारिक नैराश्यमयता शारिरिकरित्या दुर्बल बनविते. यामुळे हृद्यविकारासारखा जीवघेणा धोका वाढतो तसेच स्वास्थावर परिणाम करणारे इतर आजारही उद्भवतात असेही संशोधकांचे म्हणणे आहे.