Best Vegetable to Control Sugar Naturally: हिवाळा सुरू होताच सांधेदुखी, थकवा, अशक्तपणा, पचनाचे त्रास आणि वाढलेली शुगर… अशी अनेक संकटं लोकांच्या दारात उभी राहतात. अशावेळी आहारात काही बदल केले तर अनेक मोठे आजार सहजपणे दूर पळवता येतात. तज्ज्ञांच्या मते, काही विशिष्ट हिरव्या पालेभाज्या अशा आहेत की, त्या शरीराला इतकी ताकद देतात की रोगजंतू, सूज, वेदना किंवा वाढलेली साखर यांचं नावही शरीरात फिरकू शकत नाही.
अशीच एक अत्यंत चमत्कारिक पालेभाजी, जी वर्षानुवर्षे कंट्रोल न होणाऱ्या शुगरलाही आवरतं घालते, सांधे व गुडघेदुखी कमी करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि वजन घटवण्यासही मदत करते. सर्वात आश्चर्य म्हणजे ही भाजी आपल्या स्वयंपाकघरात क्वचित येते, पण तिची ताकद बहुतेक लोकांना माहीतच नाही. चला तर… जाणून घेऊया या गूढ हिरव्या भाजीचे आश्चर्यकारक फायदे
शुगर वाढत असेल तर आजच सुरू करा ‘ही’ हिरवी भाजी; वाचा जबरदस्त फायदे!
१) शुगर कंट्रोलमध्ये कमाल!
मधुमेहाने त्रस्त असणाऱ्यांसाठी ही भाजी खरोखर वरदान आहे. यामध्ये नैसर्गिक अँटी-डायबेटिक गुणधर्म आहेत, जे रक्तातील साखर वाढण्यापासून थांबवतात. नियमितपणे आठवड्यातून एकदा बनवलेली भाजी, रस्सा किंवा सूप घेतलं तर शुगर लेव्हल स्थिर राहते आणि अचानक होणाऱ्या चढ-उतारांचे प्रमाणही कमी होते.
२) गुडघेदुखी व सांधेदुखीतून त्वरित आराम
हिवाळ्यात सांधेदुखीची तक्रार वाढते. या हिरव्या पालेभाजीत असे सूज कमी करणारे घटक आहेत, जे गुडघ्यांच्या वेदना शांत करतानाच सांध्यांना बळकटही करतात. तज्ज्ञ सांगतात की, वृद्ध व्यक्तींनी आठवड्यातून किमान एकदा तरी ही भाजी खावी; यामुळे वेदना कमी होतात आणि सांधे हलके व लवचिक राहतात.
३) वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय
वजन कमी करण्याच्या मार्गावर असाल तर ही पालेभाजी तुमच्यासाठी सोन्याहून पिवळी! यामध्ये फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने पोट पटकन भरतं, वारंवार भूक लागत नाही. शिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते, ज्यामुळे वजन घटण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते.
४) इम्युनिटीला जबरदस्त बूस्ट
दरदिवशी होणारे छोटे-मोठे आजार सर्दी, खोकला, थकवा किंवा लवकर होणारा संसर्ग… यापासून शरीर वाचवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं फार महत्त्वाचं आहे. ही भाजी शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवते, ज्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती दुप्पट वेगाने वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
मग ही भाजी नेमकी कोणती?
ही चमत्कारिक भाजी म्हणजे ‘पोन्नागंती’ (Ponnaganti Greens / Water Amaranth)
पोन्नागंती ही एक पालेभाजी असून प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्राच्या काही भागांत सहज उपलब्ध होते. स्थानिक भाषेत हिला ‘गुडरु साग’, ‘वॉटर अमरंथ’, काही ठिकाणी ‘चवळीची पानं’सदृश भाजी म्हणूनही ओळखतात. यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन A, C, K, अँटीऑक्सिडंट्स आणि उच्च प्रमाणात फायबर असतं. ही भाजी शुगर, सांधेदुखी, पचनाचे विकार, वजन नियंत्रण, त्वचेचं आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.
