उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग आणि स्पॉट्स येण्याची समस्या जाणवते. यामुळे उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. उन्हाच्या दिवसात जास्त घाम येत असल्याने अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते, याचा परिणाम त्वचेवरही होतो. अशा परिस्थितीत त्वचेची जास्त काळजी घेतली नाही तर पुरळ, सनबर्न, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अॅलर्जीसारख्या समस्या निर्माण होतात.

त्वचेच्या अनेक समस्या रोखण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञांकडून नेहमी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेकदा उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्याच्या नादात तुम्ही चुकीचे स्कीनकेअर रुटीन फॉलो करता ज्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकता. अशावेळी उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवायची असेल तर रोजचे हे ५ स्कीनकेअर रुटीन फॉलो करणं आजं टाळा.

Rain in summer in Nagpur risk of disease increase
नागपुरात उन्हाळ्यात पाऊस, ‘हे’ आजार वाढण्याचा धोका..
water tank cooling tips
Jugaad Video: उन्हाळ्यात नळातून पाणी गरम येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; कडक उन्हात टाकीतील पाणी राहील थंड
Desi jugad Video Cooling Trick For SummerMan Used Mataka To Home Made Ac
उन्हाळ्यात कुलरमुळे विजेचं बिल खूप येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; पैशांची होईल मोठी बचत, VIDEO एकदा पाहाच
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप

सनस्क्रीनचा अतिवापर

सूर्याची घातक अतिनील किरणे आपल्या त्वचेला हानी पोहोचवतात. यामुळे उन्हाळ्यात त्वचारोग तज्ज्ञांकडून वारंवार ब्रॉडस्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळा असो किंवा हिवाळा प्रत्येत ऋतूमध्ये सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर सूर्य किरणांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडताना किंवा घरात असाल तरी अंघोळीनंतर सनस्क्रीन लावणं महत्वाचं आहे. यामुळे आपली त्वचा टॅन होण्यापासून वाचते. मात्र त्वचेवर वारंवार सनस्क्रीनचा वापर करून नका, अन्यथा त्वचेसंबंधीत इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी त्वचारोग तज्ज्ञांकडून तुम्ही कोणती सनस्क्रीन वापरली पाहिजे याचा सल्ला घेऊन शकतात. तसेच सनस्क्रीन दिवसातून किती वेळा वापरली पाहिजे याची देखील माहिती घ्या.

मॉइश्चरायझिंग

उन्हाळ्यात अनेकदा मॉइश्चरायझिंग क्रिम न वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण निरोगी त्वचेसाठी मॉइश्चरायझर खूप महत्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेवर मुरम आणि तेलकटपणा असला तरी मॉइश्चरायझिंग क्रिम वापरा. मॉइश्चरायझिंगमुळे त्वचेतील पाणी पातळी टिकून राहते आणि त्वचा मऊ आणि लवचिक होते. त्वचेत ओलावा नसल्यास खूप कोरडेपणा जाणवू अशावेळी त्वचा योग्य प्रकारे स्वच्छ करून नंतर हायड्रेटिंग मॉइश्चरायझचा वापर करणे योग्य ठरेल.

हेवी मेकअप टाळा

जर कडक उन्हात तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर हेवी मेकअप करणं टाळा. कारण हेवी मेकअपमुळे त्वचेला श्वास घेता येत नाही. यामुळे उष्णता आणि आर्द्रता ही समस्या वाढते. मेकअपमधील फाउंडेशन, कन्सीलर आणि इतर घटकांमुळे मेकअप हेवी होतो यामुळे चेहऱ्यावर बारीक छिद्र होतात. उन्हाळ्यात हेवी फाउंडेशन आणि इतर सौंदर्यप्रसाधनांऐवजी तुम्ही टिंटेड मॉइश्चरायझर आणि टिंटेड लिप बाम थोड्या मेकअपसह लावा.

एक्सफोलिएट

धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर मृत पेशी तयार होतात. अशा परिस्थिती त्वचेला एक्सफोलिएट करणं गरजेचं आहे. या प्रक्रियेत त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि नवीन पेशी तयार केल्या जातात. शरीरावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकणे महत्वाचे आहे कारण त्या जमा झाल्यामुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये अडकून राहतात. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही होममेड मॉइश्चरायझर वापरू शकता. मात्र सॅलिसिलिक ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड, मॅन्डेलिक ऍसिड किंवा अगदी बेंझॉयल पेरोक्साइड सारखे कोणतेही एक्सफोलिएटिंग प्रोडक्ट वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्वत:ला हायड्रेटेड न ठेवणे

उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेशन ही एक महत्त्वाची बाब आहे. शरीर हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी हंगामी फळं, भाज्या खाण्यासह दररोज २-३ लिटर पाणी पिणे गरजेचं आहे. उन्हाळ्यात पाण्याचे जास्त सेवन केल्यास उष्माघाताचा धोका कमी होतो. मात्र अनेकजण उन्हाळ्यातही पाण्याचे सेवन योग्यप्रमाणात करत नाहीत यामुळे उष्माघातसह, डोकेदुखी आणि इतर आजार सतावतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच उष्माघातापासून वाचण्यासाठी एक अॅडव्हायजरी जारी केली होती. ज्यात लोकांना कॉफी, चहा आणि कार्बोनेटेड शीतपेय यांसारखे डिहायड्रेशनची समस्या वाढवणारे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला होता. त्याऐवजी लिंबू पाणी आणि नारळ पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला होता.